बेली फॅटमुळे हाडे होतात कमुकवत, याकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष ;जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बेली फॅटमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. तसेच सोडा, अल्कोहोल, धूम्रपानामुळेही हाडे कमकुवत होण्याचा त्रास होतो. शरीराची कार्यप्रणाली व्यवस्थित ठेवण्यासाठी मजबूत हाडांची आवश्यकता असते. त्यामुळे हाडांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. हाडे मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहार महत्वाचा आहे. वाढत्या वयाबरोबर हाडे ठिसूळ होतात, मात्र अनेक वेळा ही स्थिती आधीच निर्माण होऊ शकते. याची कारणे जाणून घेवूयात.
बेली फॅट
रजोनिवृत्तीच्या आधी महिलांच्या बेलीमध्ये अर्थात पोटात अनावश्यक चरबी जमा होऊ लागते. या चरबीमुळे निर्माण होत असलेल्या हार्मोनमुळे शरीरावर सूज वा जळजळ अशी लक्षणे दिसतात. या कारणामुळेच हाडे ठिसूळ होऊ लागतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होऊ लागते.
अल्कोहोल
अल्कोहोलचे अतिसेवन केल्याने यकृत, मेंदू व शरीराच्या इतर अवयवांबरोबरच हाडांवरही दुष्परिणाम होतो. हाडांची घनता कमी होते. यास ऑस्टियोपेनिया म्हणतात.
सप्लीमेंट्स
कॅल्शियमचा डोस पूर्ण करण्यासाठी कधीही सप्लीमेंट्सचा आधार घेऊ नका. कॅल्शियमची पूर्तता नेहमी खाद्यपदार्थांच्या माध्यमातून करावी. सप्लीमेंट्समुळे मुतखड्याचा धोका अधिक असतो. ज्येष्ठ नागरिकांना त्यामुळे हृदयविकाराचा धक्का बसू शकतो.
दातांपासून सुरुवात
हाडांचे नुकसान होण्याची सुरुवात शरीराच्या कोणत्याही अवयवापासून होऊ शकते. दात वा हिरड्यांपासूनही त्याची सुरुवात होऊ शकते. जर जबड्याच्या हाडाचे नुकसान झाले तर दात कमकुवत होऊन पडू शकतात. जर डेंटिस्टकडून नियमित तपासणी केली तर एक्स-रे काढून ऑस्टियोपोरोसिसची स्थिती कळू शकते.
Comments are closed.