अहमदनगर : आरोग्यनामा ऑनलाइन – वाकडी (राहाता), अहमदनगर ये थील सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भिती निर्माण झाली आहे.
वाकडी येथील सिमा अमोल आहेर (वय २५) या गर्भवती महिलेस काही दिवसांपूर्वी अचानक दुखू लागल्याने राहाता येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान सिमा हिस गोचिड ताप व पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे निष्पन्न झाले. या आजारावर उपचार घेऊन सिमा यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर सीमा ह्या चितळी येथील माहेरी असताना त्यांना अचानक खोकला सुरु झाला. उपचारासाठी श्रीरामपूर येथे दाखल केले असता रुग्णालयाने त्यांना पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. उपचार सुरु असताना तीन दिवसांनी सीमा आहेर यांची प्राणजोत मालवली.