आरोग्यनामा ऑनलाईन- खजुरचे(dates) सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. डॉक्टर दुधासोबत खजूर खाण्याची शिफारस करतात. परंतु खजूरचे(dates) सेवन किती फायदेशीर आहे. याबद्दल मधुमेहाच्या रुग्णांच्या मनात असा प्रश्न अनेकदा उद्भवतो. मधुमेह रूग्णांना कॅलरीयुक्त पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहिल. दुसरीकडे, अती साखर आणि कॅलरीची जास्त असते यामुळे खजूर मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर आहे की नाही .
मधुमेहाच्या रुग्णांना खजूर योग्य आहे का?
सेलेनियम, तांबे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शियम समृद्ध खजूर आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु मधुमेहाच्या रुग्णाला त्याच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. परंतु मधुमेह रूग्ण रोज १-३ खाऊ शकतात परंतु त्यासाठी रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. आपली इच्छा असल्यास, बिना साखरेच्या दुधामध्ये खजूर उकळवून देखील ते पिऊ शकता.
साखरेची पातळी नियंत्रित करते
खजुरामध्ये ग्लूकोज आणि फ्रुक्टोजची मात्रा चांगली असते, ज्यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो.
जाणून घ्या
खजूरामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. खजूर कोरडे असल्याने, यात कॅलरीचे प्रमाण जास्त असल्याने या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. त्यात साखरेचे प्रमाणही जास्त आहे. जरी त्यात नैसर्गिक साखर असली तरी, आपण ते नियमितपणे घेत असाल तर व्यायाम आणि इतर गोड गोष्टी नक्कीच टाळा.
खजूर खाण्याचे आणखी काही चांगले फायदे
१)हृदयाला निरोगी ठेवून हे कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्त परिसंचरण योग्य ठेवते. ज्यामुळे पेशींचे नुकसान, कर्करोग आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
२)उर्जाशक्ती सुधारते, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम समृद्ध खजूर शरीरात ऊर्जा देतात आणि मूड सुधारतात.
३)खराब पचनक्रिया ठीक करतात. अन्न पचविण्यात त्रास होतो त्यांच्यासाठी त्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. यामुळे बद्धकोष्ठता आणि पित्तासारखा त्रास कमी होतो.
४)दमामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी २-३ खजूर खाल्ल्यास दम्याच्या समस्येपासून मुक्तता मिळते.
५)सर्दीपासून मुक्त होण्यासाठी २-३ खजूर, मिरपूड आणि वेलची पाणी टाकून उकळवा. झोपण्यापूर्वी हे पाणी प्या. यामुळे बराच दिलासा मिळेल.