आरोग्यनामा टीम – नितळ, सुंदर आणि डागविरहित असलेल्या चेहऱ्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. सुंदर डोळे देखील आपले सौंदर्य खुलवतात. मात्र आजकालच्या धकाधकीच्या जीवनातील थकवा, ताणतणाव, चिंता, अपुरी झोप, मद्यसेवन, धूम्रपान, अनुवांशिक पणा यामुळे डोळ्यांच्या आसपास तयार होणाऱ्या वर्तुळांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. पण फक्त हेच कारण नाही तर. अनेक पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे डार्क सर्कल्स येतात. तर आज आम्ही तुम्हाला डार्क सर्कल येण्यामागची कारणे सांगणार आहोत.
व्हिटॅमिन ए ची कमतरता
व्हिटॅमिन ए मध्ये अँटी-ऑक्सिडेंट्ससारखं असल्यामुळे त्याचा नियमित आहारात समावेश करावा. कारण व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे डार्क सर्कलची समस्या निर्माण होऊ शकते. व्हिटॅमिन ए युक्त फळे खाल्याने त्वचेची सुंदरता वाढते आणि ब्लड सर्कुलेशनही योग्य प्रकारे सुरळीत राहते. तसेच याने शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर टाकले जातात. म्हणून डाएटमध्ये गाजर, कलिंगड, पपई यासारख्या फळांचा समावेश करावा.
व्हिटॅमिन सी ची कमतरता
व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या उद्भवते. व्हिटॅमिन सी त्वचेला हेल्दी आणि निरोगी ठेवण्याचं काम करत. याच्या नियमित सेवनाने नसा मजबूत होता. तसेच त्वचा लवचिक होते आणि डोळ्यांखालील आलेली सूज उतरण्यास मदत होते. म्हणून डार्क सर्कलची समस्या दूर करायची असेल तर वेगवेगळ्या फळांच्या सेवनासोबत हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यासाठी संत्री, लिंबू, फ्लॉवर, ब्रोकली यांचा समावेश करावा. यामाध्यमातून तुम्हाला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते.
उपाय
१. रोज कमीत कमी ८ तासांची झोप.
२. दिवसा घराबाहेर पडताना सन ग्लासेसचा वापर.
३. डोळ्यांच्या आसपास काळे डाग असतील तर कच्च्या बटाट्याची किंवा काकडीची पेस्ट लावा.
४. दिवसातून चेहरा दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवा.
५. तसेच व्हिटॅमिन सी, के आणि व्हिटॅमिन इ युक्त असलेली क्रीम यासाठी वापरु शकता.
पोषक आहार
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिला आपल्या आरोग्याकडे आणि आहाराकडे दुर्लक्ष करताना दिसतात. यामुळे तारुण्यातच डोळ्यांच्या चारही बाजूने बारीक रेषा दिसू लागतात. हसतेवेळी अथवा जांभई देताना त्वचेवर ताण पडतो. क्रॅश डायटिंग यामागचं मुख्य कारण आहे. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर याने त्वचा आकुंचन पावते आणि सुरकुत्या वाढतात. म्हणून पोषक आहार घेणे त्यासाठी फार महत्वाचे असते. दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. ताजी फळे, ज्यूस, ताक लिंबू पाणी आणि लस्सीचे सेवन करावे. नेहमी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. क्रॅश डायटिंग टाळा कारण त्याने वजन कमी झाल्यास त्वचा सैल पडते आणि सुरकुत्या दिसू लागतात.