आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हातात असणाऱ्या विविद ग्याझेटमुळे माणसाच्या मेंदूची कार्य क्षमता तशीही कमीच झाली आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवण्याचंकाम हे इलेक्ट्रोनिक माध्यम आपल्यासाठी करत आहेत. मेंदूला आपण त्याच्या कामापासून दूर ठेवत आहोत याचा परिणाम म्हणजे आपण स्मार्टफोनवर जास्त अवलंबून आहोत. मेंदूची नैसर्गिक शक्ती आपण वापरणेच सोडून दिले आहे. विसरभोळेपणा आणि आकडेमोड अश्या सध्या सध्या बाबी हि मेंदू करेनासा झाला आहे. हे सगळं टाळायच असेल तर योगा आणि मेडिटेशन तुम्हाला चांगली मदत करू शकते.
योगा केल्याने मेंदूचं कार्य उत्तम राहतं शिवाय त्यासोबतच विचार करण्याच्या क्षमतेतही फरक पडतो. नवीन केलेल्या संशोधनानुसार, दररोज जर २५ मिनिटं हठयोगा आणि शांतपणे मेडिटेशन केलं तर मेंदूचं कार्य सुधारत आणि चांगले परिणाम मेंदूच्या कार्यावर होतात.
पब्लिक हेल्थ आणि हेल्थ सिस्टीमचे सहाय्यक प्राध्यापक पिटर हॉल म्हणाले की, “हठयोगा आणि मेडिटेशन या दोघांचाही मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. यामुळे व्यक्तीच्या श्वास घेण्यावर आणि वागणं यावर आपोआप परिणाम होतो.”
पिटर पुढे म्हणाले की, “मेंदूचं कार्य आणि विचार करण्याची क्षमता यावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे व्यक्ती त्याच्या दररोजच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रीत करू शकते.”
यासाठी संशोधकांनी 31 जणांवर अभ्यास केला. यामध्ये सहभागी झालेल्यांनी सांगितल्याप्रमाणे २५ मिनिटं हठयोग केला, २५ मिनिटं मेडिटेशन केलं आणि त्यासोबत २५ मिनिटं शांतपणे वाचन केलं.
या संशोधनाचे मुख्य अभ्यासक किंबरली लु म्हणाले की, “मेडिटेशनमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं आहे. ज्यामुळे मेडिटेशन कऱणाऱ्या व्यक्तींच्या वागण्यात बदल दिसून आला. तर योगामुळे त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर चांगला परिणाम झाला.”
या संशोधनानुसार असं समजलं की, मेडिटेशन आणि हठयोगा या दोन्ही गोष्टींमुळे उर्जाही वाढण्यास मदत होते. मात्र मेडिटेशनपेक्षा हठयोगाचा प्रभाव जास्त आहे.
लु पुढे म्हणाले की, “आम्ही केलेल्या संशोधनानुसार हठयोगा आणि मेडिटेशन केल्याने मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो. आणि त्यामुळे मेंदूचं कार्य सुधारण्यास मदत होते.”