आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health News | नियमित एरोबिक्स केल्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटते. या व्यायाम प्रकारामुळे मेंदूला चांगला रक्तपुरवठा होत असल्याने डिप्रेशन सुद्धा कमी होते. एरोबिक्स केल्यास मेंदू फिट राहतो, बुद्धी व स्मृती वाढते, स्मृतीभ्रंश, अल्झायमरसारखे आजार दूर राहतात. एरोबिक्समुळे हृदयाला व फुफ्फुसांना सुद्धा व्यायाम मिळतो. यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. एरोबिक्समध्ये फ्लोअर एरोबिक्स व बेंच एरोबिक्स असे दोन प्रकार आहेत. (Health News)
काय आहे एरोबिक्स
सत्तरच्या दशकात परदेशात एरोबिक्स लोकप्रिय झाले होते. त्यानंतर यामध्ये आणखी काही नवीन प्रकार आले. झुंबा, बॉलीवूड डान्स याचा मुळ पाया एरोबिक्स आहे. यामध्ये संगितावर तालबद्ध कवायत केली जाते. यामध्ये स्टेप्स खूप महत्वाच्या असतात. सतत वेगवेगळ्या काँबिनेशन्समध्ये हा व्यायाम प्रकार केला जातो.
हे आहेत फायदे
स्टॅमिना वाढतो
यात वेगाने हालचाली होत असल्याने शरीराला चांगला रक्तपुरवठा होतो, यामुळे हृदयाचे काम वाढते. प्राणवायू अधिक घ्यावा लागतो. त्यामुळे श्वासोश्वासही वाढतो. ३ ते ४ महिने सातत्याने हे व्यायाम केल्यानंतर स्टॅमिना वाढल्याचे दिसून येते.
वजन कमी होते
चयापचय सुधारल्यामुळे वजन कमी होते. यासाठी योग्य आहारही जरूरी आहे.
मधुमेह, रक्तदाब
उच्च रक्तदाब आणि मधुमेह असल्यास प्रकृतीनुसार योग्य सल्ला घेऊन हा व्यायाम करावा. या आजारांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम व्यायामांनी काही प्रमाणात कमी होतात.
संधिवात, हाडे
यामुळे सांध्यांना चांगला व्यायाम होतो. संधिवात, हाडे ठिसूळ होणे या समस्या होत नाहीत.
स्मृतिभंशाचा
एरोबिक्समुळे हृदयाला व फुप्फुसाला व्यायाम मिळतो. त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा तसेच स्मृतिभंशाचा धोकाही कमी होतो.
मजबूत स्नायू
लयबद्ध हालचालींमुळे स्नायूंना चांगला व्यायाम होतो. स्नायू पिळदार होतात.
रोगप्रतिकारक शक्ती
एरोबिक्स करताना घाम खूप येतो आणि शरीरातील नको असलेली द्रव्ये बाहेर टाकली जातात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. संप्रेरकांची यंत्रणा, चयापचय क्रिया सुधारते आणि चांगली भूक लागते.
Web Title :- pregnancy process and myths related to pregnancy
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे