आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बेसन आणि दही हे दोन पदार्थ वापरून तयार केलेल्या फेस पॅकमुळे चेहरा तत्काळ उजळतो. तेलकट त्वचा, कोरडी त्वचा, पिंपल्स असले तरी हा फेसपॅक सूट होतो. एका बाऊलमध्ये २ चमचा दही घेऊन त्यामध्ये एक चमचा बेसन मिळवा. ही क्रिमी पेस्ट चेहरा व मानेवर लावा. १५ ते २० मिनिट ते तसेच ठेवा. नंतर चेहरा धुवून घ्या. हे रोज लावावे. दिवसभरात कधीही लावू शकता. १५ दिवसांत चांगला परिणाम दिसून येतो.
हे आहेत फायदे –
१) या पॅकचा परिणाम ताबडतोब दिसून येतो.
२) दहीतील लॅक्टीक अॅसिड आणि गुड बॅक्टेरियामुळे चेहरा उजळतो.
३) क्लीजिंगही होते.
४) अतिरीक्त तेल नियंत्रणात राहते.
५) चेहरा मुलायम होतो.
६) इंफेक्शनपासूनही बचाव होतो.