आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सीताफळ हे एक मधुर आणि विशिष्ट चव असणारे फळ आहे. यात कॅल्शियम आणि फायबरसारखे घटक असल्याने आर्थरायटिस, बद्धकोष्ठतेवर ते गुणकारी आहे. सीताफळात व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर ही पोषकतत्त्व असतात. याच्या झाडाच्या सालीत टॅनिन असल्याने त्यापासून औषध तयार केले जाते. याच्या झाडाची पाने कॅन्सर आणि ट्यूमरसारख्या आजारांवर लाभदायक आहेत. या फळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
पचनक्रिया
यात भरपूर फायबर असल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते.
मधुमेह
हे खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. यामुळे मधुमेहापासून बचाव होतो.
डिप्रेशन
यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्पलेक्स असते. यामुळे तणाव दूर होतो.
रक्तदाब
यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
हृदयरोग
यातील मॅग्नशियम हृदयरोग टाळण्यास मदत करते.