आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दही-भात खाल्ल्याने अॅसिडिटी अथवा पोटाच्या काही समस्यांमध्ये लवकर आराम मिळतो. अशा समस्यांमध्ये लगेच औषध घेण्यापेक्षा हा उपाय करणे जास्त हिताचे ठरते. दही-भात खाल्ल्याने आणखी देखील काही समस्या दूर होतात. दही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे आपण जाणून घेणार आहोत.
अपचन
अपचन किंवा पित्त असल्यास जेवणात दही-भात खावे. भात पचण्यास सोपा असतो. यामुळे वेदना आणि त्रास होत नाही.
वजन
वजन कमी करायचे असल्यास दही-भात आवश्य खा. परंतु दोन्ही वेळ दही भात खाऊ नये. मर्यादित प्रमाणातच सेवन करावे.
तणाव
दही खाल्ल्याने ताण कमी होतो. यातील प्रोबायोटीक बॅक्टेरिया आणि अॅन्टीऑक्सिडंट्स, चांगले फॅट्स फायदेशीर असतात. दह्यामुळे मूड चांगला होतो.
ताप
तापामध्ये तोंड कडू झाल्याने कशाचीही चव लागत नाही. अशावेळी दही-भात खा. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
बध्दकोष्ठता
दह्यामधील गुड बॅक्टेरिया पोटाचे कार्य सुधारण्यात मदत करतात. बध्दकोष्ठतेची समस्या होत नाही.