योग्य प्रमाणात दही सेवन केल्यास आरोग्य राहिल उत्तम
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दुध आरोग्यासाठी अतिउत्तम असून आयुर्वेदातही दुधाचे महत्व सांगण्यात आले आहे. याशिवाय ताकाचे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्व असते. यासाठीच दुध, ताक घेण्याकडे सर्वांचाच कल असतो. लहान मुलांना दुध तर खूप आवश्यक असते. दुधाचे अन्य प्रकारही शरीराला तेवढेच आवश्यक आहे. यापैकी दही सेवनाने शरीराला अनेक लाभ होऊ शकतात. त्यामुळे आहारात दह्याचा समावेश करणे आवश्यक आहे. दही आरोग्यास लाभदायक असले तरी त्याचे सेवन कसे आणि किती करावे, याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती आपण घेणार आहोत.
जीवनशैली बदलल्याने प्रत्येकाची दिवसभर धावपळ सुरू असते. या धावपळीत आहार आणि व्यायामाकडे दुर्लक्ष झाल्यास अनेक शारीरीक व्याथी होऊ शकतात. अशाप्रकारे धावपळीचा दिनक्रम असल्याने अनेकांना पोटाच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. आहारामध्ये दह्याचे सेवन केले तर अनेक आजारांपासुन आपण दूर राहू शकतो. मात्र दही खाताना काही गोष्टींचे पालन केल्यास ते शरीरासाठी उपयुक्तच ठरते. यासाठी नेहमी ताज्या दह्याचेच सेवन केले पाहिजे.
तुम्ही जर रात्री खात असाल तर त्यामध्ये साखर, थोडे काळेमीठ किंवा मध टाकावे. मांसाहार करताना दह्याचे सेवेन करणे टाळले पाहिजे. मधुमेह असणाऱ्यायांनी दही कमीच खावे. दह्याचे सेवन नियमित केल्यास लहान मुलांचे पोटाचे विकार कमी होण्यास मदत होत. त्वचारोग असणाऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय दह्याचे सेवन करु नये. दह्याच्या अती सेवन करणे कधीही करू नये. पाईल्स असणारांनी दह्याचे सेवन काळजीपूर्वक केले पाहिजे.