आरोग्यनामा ऑनलाईन- आपल्या स्वयंपाक घरातच असे अनेक पदार्थ असतात, जीरं (cumin) आणि गुळाच्या सेवनाने ’या’ 4 गंभीर समस्या राहतील दूर जे आपलं आरोग्य नेहमी चांगले ठेवू शकतात. मात्र, या पदार्थांचा वापर कशासाठी आणि कसा करायचा याबाबत माहिती असणे खुप आवश्यक आहे. असे अतिशय लाभदायक दोन पदार्थ म्हणजे जीरं (cumin) आणि गुळ आहेत. हे दोन्ही पदार्थ स्वयंपाक घरात मोठ्याप्रमाणात वापरले जातात. मात्र, यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा वापर करून तुम्ही आरोग्य चांगले ठेवू शकता. जिरं आणि गुळाचं पाणी कसं तयार करावं आणि त्याचे फायदे कोणते ते जाणून घेवूयात…
पाणी तयार करण्याची कृती
एका भांड्यात 2 कप पाणी घेऊन यामध्ये 2 ते 3 चमचे गुळाचा चुरा आणि एक चमचा जिरे टाकून उकळवा. नंतर हे पाणी कोमट झाल्यावर प्या. हे पाणी सकाळी रिकाम्या घ्यावे.
हे आहेत फायदे
1 डोकेदुखी
कामाच्या ताणामुळे होणार्या डोकेदुखीवर गूळ आणि जिरेचे पाणी गुणकारी आहे.
2 श्वसन समस्या
सर्दी, खोकला आणि श्वसनाशी निगडीत आजार, अस्थमा, पचनाच्या समस्या, ब्रोंकायटिस आणि एलर्जी संबंधित आजारांवर हे पाणी फायदेशीर आहे.
3 रक्ताची कमतरता
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास हे पाणी प्यावे. यामुळे ब्लर्ड सर्क्यूलेशन सुद्धा चांगले होते.
4 रोगप्रतिकारकशक्ती
हे पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. खोकला, लिव्हरचे आजार होत नाहीत.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.