आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जास्त प्रमाणात काकडीचे सेवन केल्यास किडनी फेल होण्याची गंभीर समस्या होण्याचा धोका असतो, असे तज्ज्ञ सांगतात. रक्तातील पोटॅशियमचे प्रमाण वाढल्याने किडनी फेल होते. एकाच वेळी ५ पेक्षा जास्त काकडी खाल्ल्याने ही समस्या होऊ शकते. यामुळे किडनीचे आजार असणारांना काकडी न खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो.
हार्ट रेट वाढतो
रक्तातील पोटॅशियमचे प्रमाण जास्त झाल्यामुळे पल्स रेट वाढतात. यामुळेच ज्या लोकांना हार्टसंबंधीत आजार आहेत. त्यांनी काकडीचे जास्त सेवन करु नये.
कडू काकडी विषारी
कडू काकडी विषारी असल्याने ती खाणे टाळावे. काकडी जेवढी कडू असते, तितकीच विषारी असते.
एबडॉमिनल क्रॅम्प
जास्त काकडी खाल्ल्याने पोट आखडणे आणि ब्लोटिंग होऊ शकते. यातील फायबरमुळे पोटातील गॅस आतड्यांकडे जातात आणि यामुळे वेदना होतात.