आरोग्यानामा ऑनलाईन टीम : शरीराला थंडावा मिळावा, यासाठी कोणते पदार्थ खावेत, असा प्रश्न अनेकांना नेहमीच पडतो. यावर काकडी हे एकमेव उत्तर आहे. शरीराला थंडावा मिळावा म्हणून काकडीच्या विविध रेसिपी तुम्हाला करता येऊ शकतात. या रेसिपींची माहिती आपण आज घेणार आहोत.
या आहेत काकडीच्या रेसिपी
१ काकडी सलाड
काकडी धुऊन त्याचे काप करून सलाड म्हणून खाऊ शकता. या फोडींना मीठ व मिरी पावडर लावा.
२ काकडीचा ज्यूस
काकडीचा रस, लिंबाचा रस, साखर यांचे मिश्रण थंड करून ते प्यावे.
३ काकडीचा रायता
काकडी, टोमॅटो, गाजर यांचा रायता तयार करून खा.
४ काकडीचे पकोडे
काकडीचे गोल काप कापून बेसन पीठात बडवून बटाटा भजीप्रमाणे तळून घ्या. सॉससोबत खा.
हे आहेत फायदे
* शरीराला थंडावाही मिळतो.
* शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
* शरीराला उष्णतेचा त्रास होत नाही.
* डोळ्यांना किंवा त्वचेला होणारा दाह कमी होतो.
Visit : arogyanama.com