आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अननस न आवडणारा व्यक्ती आपल्याला सापडणार नाही . लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानांच हे फळ आवडते. अननस हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत अननसाचे फायदे अतिशय गुणकारी ठरतात. कारण अननसमुळे शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच शरीराला उर्जा मिळते. आज त्याबाबत जाणून घेऊयात…
१) अननसमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C असल्यामुळे त्वचा हेल्दी होण्यास आणि चेहऱ्यावर येणारे पिंपल्स जाण्यास मदत होते. अननस खाल्याने त्वचा अनेक काळापर्यंत तजेलदार राहते.
२) अननसमध्ये ब्रोमेलॅन एंजाइम असल्यामुळे पचनक्रिया सुरळित राहते. अननसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं जे डायजेशन सिस्टम दुरुस्त करते.
३) अननसमधील अॅन्टी-इन्फ्लेमेंट्री गुण अतिशय फायदेशीर असतात. हाता-पायाला काही लागल्यास येणारी सूज कमी करण्यास अननस मदत करते.
४) संधिवातामुळे आलेली सूज करण्यासाठी तसेच हाडं मजबूत करण्यासाठी अननस गुणकारी ठरते.
५) अननसमध्ये असणारे कॅल्शियम आणि मॅंगनीज हाडांना मजबूत बनवण्याचे काम करते. अननसमध्ये मोठ्या प्रमाणात मॅंगनीज असते. एका कपभर अननसमध्ये ७३ टक्के इतकं मॅंगनीज असते.
६) अननसामध्ये असणारे व्हिटॅमिन C आणि Bromelain इन्फेक्शन पसरवणाऱ्या वायरसपासून लढण्यासाठी मदत करते.
७) हिरड्या आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अननस प्रभावी ठरते. तसेच हिरड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी अननसाचा रस प्रभावी ठरतो.
८) अननसाचा रस पिण्याने जुनी उच्च रक्तदाबाची समस्या बरी होते. आर्थरायटिसच्या आजारातही अननसाचा रस फायदेशीर ठरतो.
९) शरीरावरील फोड्यांसाठी अननस खूप फायदेशीर आहे.अननसाचे तुकडे बारीक करून त्याची पेस्ट करून ती फोड्यांवर लावल्याने आराम मिळतो.
१०)अननस आपल्या पाचन व्यवस्थेसाठी अमृतासारखे काम करते.त्यामुळे भरपूर प्रमाणात अननस खाल्याने अराम मिळतो.