आरोग्यनामा ऑनलाईन- कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या रोज वाढत आहे. यापासून वाचण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी अनेक संशोधन सुरू आहेत. तसेच कोरोना व्हायरस वॅक्सीनवर सुद्धा अनेक शोध सुरू आहेत. 165 पेक्षा जास्त कोरोना व्हायरस वॅक्सीन प्रीक्लिनिकल आणि क्लिनिकल चाचण्यांच्या विविध टप्प्यात आहेत, ज्यामध्ये 33 पेक्षा जास्त वॅक्सीन मानवी चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात आहेत.
याबाबतीत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना वॅक्सीन महामारीच्या संसर्ग पसरण्यापासून रोखणे आणि नियंत्रित करण्यास सक्षम आहे. या पार्श्वभूमीवर खुलासा झाला आहे की, अस्थमाच्या रूग्णांना कोरोना संसर्गाने मृत्यूचा धोका खुप कमी आहे. जर व्यक्ती संक्रमित झाली, तर थोड्या लक्षणांमध्ये त्यास हॉस्पीटलमध्ये भरती होण्याच गरज भासत नाही. तर सामान्य व्यक्तींच्या तुलनेत अस्थमाच्या रूग्णांच्या मृत्यूची शक्यता सुद्धा अतिशय कमी असते.
हे संशोधन बोस्टन हेल्थ केअरमध्ये संशोधकांनी केले आहे. या संशोधनात अस्थमाने पीडित 562 रूग्ण आणि कोरोना व्हायरसने संक्रमित 2,686 लोकांना सहभागी केले होते. तर सर्व लोकांचे वय एकसमान होते. दोन्ही टीमच्या सदस्यांना हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. यामध्ये अस्थमाच्या तीन टक्के रूग्णांना यांत्रिक व्हेंटिलेशनची सामान्य आवश्यकता होती. तर सामान्य कोरोना व्हायरसने संक्रमित चार टक्के रूग्णांना यांत्रिक व्हेंटिलेशनची आवश्यकता होती. गंभीर अस्थमाच्या 44 लोकांची स्थिती खुपच नाजूक होती, परंतु कुणाचा मृत्यू झाला नाही.
याबाबत संशोधकांचे म्हणणे होते की, अस्थमाच्या रूग्णांची कोरोना व्हायरसने मरण्याची शक्यता 70 टक्के कमी होती. मात्र, संशोधकांना हे शोधण्यात अपयश आले की, कोणत्या कारणामुळे अस्थमाच्या रूग्णांना कोरोना व्हायरसच्या संसर्गाने मरण्याचा धोका कमी आहे. या विषयावर संशोधन केले जात आहे. लवकरच या रहस्यावरील पडदा बाजूला होण्याची पूर्ण शक्यता आहे.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.