आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Cough Symptoms | कोरोनाच्या बहुतांश रूग्णांना खोकल्याचा सामना करावा लागतो. हंगामी खोकला एक सामान्य समस्या आहे परंतु कोरोनाचा खोकला खुप गंभीर होऊ शकतो. समस्या ही आहे की, लोकांना अजून या गोष्टीची माहिती नाही की त्यांना सामान्य खोकला आहे की, कोरोनामुळे खोकला येत आहे. (Cough Symptoms)
पाणी असणार्या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या
कोरोना व्हायरसमुळे होणार्या सूक्या खोकल्यात सामान्यपणे एक खुपच विचित्र आवाज येतो, जो घशाच्या मागच्या बाजूने होतो. तो आवाज बदलवतो. यामध्ये आवाजात कर्कशता किंवा भूंकण्यासारखे वाटते. असे यामुळे होते कारण खोकल्यासह वायुमार्ग सतत बदलत असतो.
फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या
श्वासाच्या त्रासासह खोकला आणि ताप कोरोनाच्या संसर्गाचा ठोस संकेत आहे. सतत सूका खोकला श्वसन मार्गावर खुप दबाव टाकतो. जर असे झाले तर याचा अर्थ आहे की, हा हंगामी खोकला नाही आणि तुम्ही व्हायरसने संक्रमित असू शकता. कोरोनाच्या 40 टक्के रूग्णांनी सांगितले की, सुरूवातीच्या दिवसात त्यांना श्वास घेण्याचा त्रास जाणवला. श्वासाचा त्रास सुद्धा लाँग कोविडचा संकेत आहे. बहुतांश लोक संसर्गातून बरे झाल्यानंतर सुद्धा अनेक आठवडे त्रास अनुभवतात.
–
दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
घशात खवखव होणे कोरोनाचे सामान्य लक्षण आहे आणि प्रत्येक व्यक्तीत वेगळे असू शकते. कोरोना प्रकरणात व्हायरस नाक आणि घशाला जोडलेल्या पडद्यात प्रवेश करतो, ज्यामुळे त्यास सूज येऊ शकते, ज्यामुळे खवखव होऊ शकते. ही खवखव आणि वेदनेला ’ग्रसनीशोथ’ म्हटले जाते. कोरोनाच्या प्रकरणात कुणाला घशात खवखवसह ताप, सूका खोकला आणि थकवा ही लक्षणे जाणवतात.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ‘हे’ 7 फायदे मिळवण्यासाठी आवश्य करा पुदीन्याचा उपयोग, जाणून घ्या
सामान्य सर्दी आणि फ्लूच्या दरम्यान नाक भरल्याने अनेक समस्या होऊ शकतात.
यासोबतच वास आणि चव कमी होणे ही लक्षणे असू शकतात.
पण यासोबत खोकला सुद्धा झाला तर कोरोनाशी संबंधीत असू शकतो.
कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये वासाची क्षमता गमावण्याचा प्रकार सरासरी 41 टक्के आहे.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण
तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या