आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Corn Benefits | पावसाळ्यात गरमागरम मक्याचे कणीस खाणे सर्वांनाच आवडते. मक्यापासून बनणारे पॉपकॉर्नदेखील अनेकांना आवडतात. चविष्ट असलेले हे पदार्थ संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे (Corn Benefits) होतात. हे फायदे कोणते ते जाणून घेवूयात.
100 ग्रॅम उकडलेल्या मक्यात काय आहे…
96 कॅलरी, 73% पाणी, 3.4 प्रोटीन, 21 ग्राम कार्ब, 4.5 ग्रॅम शुगर, 2.4 फायबर आणि 1.6 फॅट असते. याचा ग्लायसेमिक इंडेक्ससुद्धा कमी असतो. 112 ग्रॅम पॉपकॉर्नमध्ये 16 ग्रॅम फायबर, भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आढळते. कोलेस्ट्रॉलचा स्तर खुप कमी असतो.
मक्यातील पोषकतत्व आणि व्हिटॅमिन
मक्यात भरपूर प्रमाणात फॉस्फरस, मँगेनीज आणि झिंक आढळते. स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन बी5 आणि बी9 आढळते. शरीरातील फॉलिक अॅसिडची कमतरता दूर करते.
हे आहेत फायदे
1. डोळ्यांसाठी लाभदायक
डोळ्यांसाठी मका लाभदायक आहे, दृष्टी चांगली होते. वयासोबत होणारे ग्लूकोमा आणि मोतीबिंदू सारखे आजार दूर ठेवते.
2. हाडे मजबूत होतात
यातील नैसर्गिक कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात, ऑस्टियोपोरोसिसपासून बचाव होतो. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि किडनीच्या समस्यांमध्ये लाभदायक आहे.
3. ब्लड शुगर नियंत्रणात राहते
कणसातील कार्बोहायड्रेट शरीराला ताबडतोब उर्जा देते. पचनशक्त वाढते, ब्लड शुगर कमी होते, वेट लॉससाठी लाभदायक आहे.
4. अॅनिमिया दूर करते
आयर्नच्या कमतरतेमुळे येणारा थकवा दूर होतो आणि प्रॉडक्टिव्हिटीचा स्तर वाढतो. हीमोग्लोबिनचा स्तर वाढतो. अॅनिमियावर हा रामबाण उपाय आहे.
–
5. नर्व्हस सिस्टम फंक्शन वाढते
कॉर्न खाल्ल्याने नर्व्हस सिस्टम फंक्शन चांगले होते. यातील अमीनो अॅसिडमुळे डोके शांत राहते, स्मरणशक्ती वाढते, तणाव दूर होतो, इनसोम्नियावर लाभदायक आहे. मूड चांगला राहतो, झोप चांगली येते.
6. हृदयासाठी लाभदायक
मक्क्यात कोलेस्ट्रॉल आणि सोडियम नसल्याने हृदयासाठी हे लाभदायक आहे.
7. पोटाच्या समस्या दूर होतात
पोटदुखी, अनियमित शौच, अतिसार, पोट फुगणे, बद्धकोष्ठतेत आराम मिळतो.
8. अँटी-एजिंगचे काम
मक्याच्या दाण्यांमध्ये फेनोलिक अॅसिड आणि फ्लेवोनाईड असते. हे दोन्ही अँटीऑक्सिडेंट फ्री रॅडिकल्सची समस्या दूर करतात. नवी स्कीन सेल्स तयार होतात. सुरकुत्या दूर होतात. त्वचा तजेलदार होते.
Web Title :- Corn Benefits | benefits nutrition skin effects
Sleeping Hack | झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त आहात का? 10-3-2-1 ची ट्रिक करेल काम; जाणून घ्या
Skin Care | सनस्क्रीनऐवजी ‘या’ नैसर्गिक गोष्टींचा वापर करा, तुम्हाला चमकणारी त्वचा मिळेल; जाणून घ्या