आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रत्येक घरात धन्याचा वापर केला जातो. धन्याचा उपयोग मसाले म्हणूनही केला जातो. पण धन्याच्या वापरामुळे अनेक आजार बरे होतात. त्याचप्रकारे धन्याचा अजून एक महत्वाचा उपयोग म्हणजे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढणे. धने खाल्ल्याने अजून होतात फायदे.
१) डोकेदुखी पासून सुटका :
धने आणि मिश्री मिक्स करून ग्लासभर पाण्यात उकडून प्यावे याने डोकेदुखी दूर होते.
२) हिरड्या मजबूत होतात :
अर्धा चमचा धने पावडर पाण्यामध्ये टाकून त्याच्या गुळण्या केल्याने हिरड्याच्या अनेक समस्या दूर होतात.
३) सर्दी खोकला पळतो :
धन्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने जिवाणूरोधकाचे काम करते ह्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी प्यावे.
४) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
५) धने खाल्ल्याने तोंडाचा अल्सर दूर होतो.
६) इन्सुलिन उत्तेजित करून कमी रक्तदाबाची समस्या दूर होते.
७) धने पावडर गुळामध्ये मिक्स करून खाल्ल्याने पाळीची समस्याही दूर होते.
अशा या छोट्या धन्याच्या दाण्यांमध्ये विविध गुणधर्म आढळतात. त्यामुळे तुमच्या आहारात याचा समावेश नक्कीच करावा.