आरोग्यनामा ऑनलाईन टीम – स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे, असा प्रश्न गृहिणींना नेहमीच पडतो. यामागे कारण असते ते कुटुंबाच्या आरोग्याचे. जर आरोग्य हाच मुद्दा असेल तर स्वयंपाकासाठी काही तेलांचा वापर टाळला पाहिजे. कारण काही तेलांच्या वापराने हाय कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगासारख्या समस्या होऊ शकतात. कोणत्या तेलामध्ये अन्न पदार्थ तयार करावेत, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
तिळाचे तेल
उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, हृदयविकार हे टाळण्यासाठी या तेलाचा वापर करावा. हा मॅग्नेशियम, कॅल्शियम, प्रोटीन आणि फॉस्फरसचा खूप चांगला स्रोत आहे.
मोहरीचे तेल
रोगप्रतिकारक क्षमता वाढते. अनेक संसर्गांपासून दूर ठेवते. मोहरीचे तेल हृदयविकारांची जोखीम ७० टक्क्यांपर्यंत कमी करते.
बदामाचे तेल
पोटाचे विकार, आतड्यांच्या कॅन्सरपासून बचाव होतो. कोलेस्टेरॉल कमी होते. शरीर फिट राहते. बुद्धी आणि धमण्यांसाठी फायदेशीर आहे.
नारळाचे तेल
रक्तदाब, हृदयरोग, यावर गुणकारी आहे. यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि खनिजे असतात.
ऑलिव्ह ऑइल
कोलेस्टेरॉलचे संतुलन राहते. हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. यातील फॅटी अॅसिड हृदयरोगाचे धोके कमी करते.