आरोग्यनामा ऑनलाईन टीम – फॅशनच्या बाजारात वेगवेगळ्या पद्धतीच्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा अक्षरशः भडीमार असतो. सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकाला हे ब्युटी प्रॉडक्ट्स खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र सर्वच प्रकारचे ब्युटी प्रॉडक्ट्स खरेदी करणे शक्य नसते. त्या ब्युटी प्रॉडक्ट्सपैकीच एक म्हणजे लिपस्टिक. मॅट आणि ग्लॉसी हे लिपस्टिकचे दोन प्रकार आहेत. मॅट आणि ग्लॉसी लिपस्टिक वेगवेगळी घेण्यापेक्षा तुम्ही काही टिप्स वापरून ग्लॉसी लिपस्टिकचे रूपांतर मॅट लिपस्टिकमध्ये करू शकता. जाणून घ्या तुम्ही कोणत्या पद्धतीने तुमच्या ग्लॉसी लिप्सना मॅटटच देऊन ओठांचे सौंदर्य खुलवू शकता.
१) टिश्यू आणि ट्रांस्लुसेंट पावडर घ्या. आता तुमच्या आवडीची लिपस्टिक लावा. टिश्यू आपल्या ओठांच्या नरमतेला संतुलित करतो. आता थोडा ट्रांस्लुसेंट पावडर टिश्यूवर शिंपडा आणि हे आपल्या ओठांना लावा. आता तो टिश्यू हळूच काढून घ्या आणि ओठांना मॅट लिपस्टिकमध्ये बदला. यामुळे लिपस्टिक तुमच्या ओठांवर खूप काळ टिकते.
२) ग्लॉसी लीप कलर मॅटमध्ये बदलवण्यासाठी एक टिश्यु पेपर घ्या. तो आपल्या ग्लॉसी लिपस्टिक लावलेल्या ओठांवर ठेवा. तो टिश्यू पेपर तुमच्या ओठांवरील चमक अवशोषित करेल आणि काही वेळातचआपली लिपस्टिक मॅट लिपस्टिकमध्ये बदलेल.
अशी लावा मॅट लिपस्टिक –
१) मॅट लिपस्टिकला चांगल्या पद्धतीने लावणं गरजेचं आहे. पण लिपस्टिक लावायच्या अगोदर डेड स्किनला हटवा आणि मगच ओठांना लिपस्टिक लावा.
२) लिपस्टिक लावताना अगोदर ओठांना लिप लायनार लावा.
३) मॅट लिपस्टिक लावायच्या अगोदर ओठांना मॉइश्चराइज़ करा.
४) या लिपस्टिकला काढण्यासाठी ओठांना रगडू नका. त्यासाठी ओठांना मॉइश्चराइजि़ंग क्रीम लावा.