आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीरातील दोन महत्त्वाच्या अमिनो आम्लांच्या मधला दुवा म्हणजे होमोसिस्टीन. ‘ब’ जीवनसत्त्वामुळे होमोसिस्टीनचे सीस्टिनमध्ये रूपांतर होतं. रक्तात ब जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल हे रूपांतर होत राहतं आणि होमोसिस्टीनचं प्रमाण मर्यादित राहतं. ब जीवनसत्त्वं कमी पडलं तर रक्तातील होमोसिस्टीन वाढू लागतं. होमोसिस्टीन हा रक्त घट्ट करणारा, धमन्यांना हानी पोहोचवणारा घटक आहे. रक्तातील होमोसिस्टीनची पातळी वाढल्यास हृदयाचे विकार होण्याचा धोका तब्बल तीन पटींनी वाढतो.
होमोसिस्टीनचे योग्य प्रमाण
सामान्यत: 30 मायक्रोमोल्स प्रति लिटर हे प्रमाण योग्य मानलं जातं. यापेक्षा अधिक प्रमाण म्हणजे 30 ते 100 किंवा 100 पेक्षा अधिक हे धोकादायक ठरू शकतं.
होमोसिस्टीनचे प्रमाण वाढू नये म्हणून ही काळजी घ्यावी
रक्तातील ब-12 फॉलिक अॅसिड यांची पातळी योग्य प्रमाणात राखली गेली पाहिजे.
लसूण, आले, कांदा, हळद, बदाम व अक्रोड यांचा आहारात समावेश करा.
दिवसभरामध्ये किमान दोन वाट्या कच्ची फळे किंवा सॅलेड खावे.
साखर, वनस्पती तूप, रिफाइंड तेले, मटण, मलई, लोणी यांचे सेवन टाळावे.