आरोग्यनामा ऑनलाईन- हिवाळ्यात(winter) शरीराचे तापमान कमी होते, अशावेळी आहारात अशा पदार्थांचा समावेश केला पाहिजे, जे शरीराचे तापमान वाढवण्यास मदत करतील आणि उबदारपणा जाणवेल. थंडीमुळे मेटाबॉलिज्म रेट, ऊर्जेचे संरक्षण आणि शरीराला गरम ठेवण्यासाठी कमी पडतो. यामुळेच हिवाळ्यात(winter) झोप आणि सुस्ती जाणवते. आपण अशा 8 खाद्य पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत जे हिवाळ्यात खुप आवश्यक आहेत.
1 मध : माय उपचारनुसार मधाचा गुणधर्म उष्ण आहे. याच्या नियमित सेवनाने शरीर गरम ठेवण्यास मदत होते. सर्दी, खोकला आणि फ्लू दूर राहतो, इम्युनिटी मजबूत होते. सकाळी गरम पाण्यात थोडे मध मिसळून प्या. किंवा एक चमचा मध सेवन करा.
2 तीळ
तिळात आयर्न आणि कॅल्शियम भरपूर असते, शिवाय यामुळे शरीर गरम राहते, तिळाची चिक्की खावी. यामुळे हाडे आणि मांसपेशीही मजबूत होतात.
3 भाज्या
मुळभाज्या हिवाळ्यात शरीर गरम ठेवतात. मुळा, बीट यासारख्या जमीनत उगवणार्या भाज्यांचे सेवन करावे.
4 गावठी तूप
गावठी तूप शरीराला उष्णता देते. डाळ किंवा भाजीत हे वापरू शकता. यामुळे पचन चांगले होते, बद्धकोष्ठता दूर होते, इम्युनिटी वाढते, आणि सर्दी, फ्लूपासून बचाव होतो.
5 आले
आल्यात थर्मोजेनिक गुण असल्याने हिवाळ्या ते शरीराला गरम ठेवण्यात मदत करते. यामुळे मेटाबॉलिज्म वाढते, रक्तप्रवाह चांगला होतो.
6 सुकामेवा
बदाम, काजू आणि किसमिस सारखे ड्रायफ्रूट्स शरीरात गरमी निर्माण करतात. हे कच्चे खावेत किंवा दुधात मिसळून सेवन करावे.
7 तुळस
तुळशीत व्हिटॅमिन सी, ए, झिंक आणि आयर्न भरपूर असते, जे शरीरात थंडीमुळे होणारे आजार जसे की, सर्दी, खोकला, सायनस आणि इतर श्वास समस्यांशी लढण्यात मदत करते. तुळशीची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीर गरम राहते.
8 अंडे
अंडे शरीराला उर्जा देण्यासह प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी सुद्धा देते. ज्यामुळे शरीर गरम ठेवण्यास मदत होते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.