आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्रणयामुळे दोघांनाही आनंद मिळतो. परंतु प्रणयानंतर पार्टनरकडून एखादी चूक झाल्यास मूड खराब होऊ शकतो. या चुका सहजपणे लक्षात येत नसल्याने त्याचे परिणामही उशीरा लक्षात येतात. पार्टनरवर या गोष्टींचा खूप प्रभाव पडत असतो. रिलेशनशिपसाठी या गोष्टी धोकादायक ठरू शकतात. सेक्सनंतर कोणत्या सात चूका करू नये, याविषयी जाणून घेवूयात.
फोन घेणे
सेक्सनंतर लगेच एखाद्यासोबत फोनवर बोलणे किंवा मेसेज करणे ही चूक करू नका. यामुळे पार्टनरकडे दुर्लक्ष करत असल्याचे जाणवते.
वेगळे झोपणे
लव्हमेकिंगनंतर पार्टनरपासून वेगळे झोपणे ही सर्वात मोठी चूक मानली जाते. जर तुम्हाला एकटे झोपणे आवडत असले तरीही सेक्सनंतर पार्टनरसोबतच झोपणे आवश्यक आहे. कारण तुम्ही एकटे झोपल्यास हेल्दी रिलेशनशिपसाठी आवश्यक असणारी कनेक्टीव्हिटी डेव्हलप होऊ शकणार नाही.
मुलांना जवळ झोपवणे
अनेक लोकांना इंटीमेट झाल्यानंतर मुलांना जवळ घेऊन झोपण्याची सवय असते. यामुळे तुमच्या पार्टनरची चिडचिड होऊ शकते. शक्य असल्यास मुलांची जवळच्या रूममध्ये झोपण्याची व्यवस्था करावी.
किचनकडे जाणे
लव्हमेकिंगनंतर लगेच किचनमध्ये जाणेसुद्धा चुकीचे ठरते. यामुळे पार्टनरचा गैरसमज होऊ शकतो. या चुकीची दुरस्ती करण्यासाठी पार्टनरसोबत जेवणाचा आनंद घेवून करता येईल.
कामामध्ये व्यस्त होणे
इंटीमेट सेशननंतर लगेच कामामध्ये व्यस्त होत असाल तर याचा अर्थ तुमच्या डोक्यात केवळ कामाचा विचार होता. यामुळे तुमच्या नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ शकते.
लगेच झोपणे
ही कदाचित लव्हमेकिंगनंतर करण्यात येणारी मोठी चूक आहे. सेक्सनंतर लगेच झोपणे रिलेशनशिपसाठी चांगले नाही. झोपण्यापूर्वी एकमेकांशी थोड्या गप्पा मारा. यामुळे तुमचे मजबूत होईल.
लगेच शॉवर घेणे
लव्हमेकिंगनंतर लगेच शॉवर घेण्यासाठी जाऊ नये. यामुळे पार्टनरला एकटेपणाची जाणीव होऊ शकते.