जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
आरोग्यनामा ऑनलाइन – किडनीचा कँसर हा महिला, पुरूष दोघांनाही होऊ शकतो. यामध्ये किडनीतील पेशी वाढू लागतात आणि नंतर ट्यूमर तयार होतो. हा अतिशय जीवघेणा आजार असून त्याची विधि कारणे आहेत. आनुवांशिकता, धुम्रपान, लठ्ठपणा, दिर्घकाळ एस्प्रिन, बूफ्रेनसारखी औषधे घेणे, आदी किडनी कँसर होण्याची कारणे आहेत. किडनी कँसरची शक्यता वाढल्यास डॉक्टर सर्वात प्रथम युरिन टेस्ट घेतात. ब्लड टेस्टही केली जाते. यावरून किडनी योग्यरित्या काम करत आहे की नाही, हे समजते. या टेस्टमध्ये पांढऱ्या पेशी, लाल पेशी व प्लेटलेट्स तपासल्या जातात.
हे आहेत संकेत
१ वयाच्या चाळीशीनंतर लोअर बॅक पेन ही एक सामान्य समस्या असते. मात्र ४१ टक्के किडनी रुग्णांना बॅक पेनचा त्रास होतो. यामध्ये वेदना हळूहळू तीव्र होत जातात. जर वारंवार वेदना होत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
२ वारंवार ताप, अचानक वजन कमी होणे हेसुद्धा किडनी कँसरचे संकेत आहेत. २८ टक्के किडनी रुग्णांनी वेट लॉसची तक्रार केली आहे. यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये.
३ लोअर बॅक किंवा साइड बॅकमध्ये गाठ आल्यास हा किडनी कँसरचा संकेत असू शकतो. ४५ टक्के किडनी कँसर रुग्णांमध्ये हा संकेत दिसतो. कँसरच्या प्राथमिक स्टेजमध्ये ही गाठ कठिण असते. डॉक्टरांद्वारे सिटी स्कॅन किंवा बायोप्सी केले जाते.
४ अॅनीमिया हा किडनी कँसरचा संकेत आहे. २१ टक्के किडनी कँसरच्या रुग्णांमध्ये हा संकेत दिसतो. शरीरातील लाल पेशींचे प्रमाणही कमी होते.
५ हा किडनी कँसरचा प्राथमिक संकेत आहे. ज्या रूग्णांमध्ये किडनी कँसरचे प्रमाण ४० ते ५० टक्के होते, त्यांच्यामध्ये हा संकेत दिसतो. यूरिनमध्ये रक्त आल्याने यूरिनचा रंग लाल आणि गुलाबी होतो.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी
Comments are closed.