आरोग्यनामा ऑनलाइन टीम – योग्य पद्धतीने श्वास घेतल्यास आपले आरोग्य चांगले राहते. शिवाय, आयुष्यही वाढते, असे तज्ज्ञ सांगातात. श्वास घेतांना काही चुका अनवधनाने होतात, त्या सुधारल्या तर आयुष्यमान वाढू शकते. श्वास घेताना आपण कोणत्या चुका करतो आणि योग्य प्रकारे श्वास कसा घ्यावा, याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
३० टक्केच उपयोग
करोडो लोक चुकीच्या पध्दतीने श्वास घेत असतात. मनुष्य फुफ्फूसांमध्ये श्वास भरण्याच्या क्षमतेचा फक्त ३० टक्केच उपयोग करतो. उर्वरित ७० टक्के क्षमता उपयोगात न आल्याने वाया जाते, असे संशोधक सांगतात.
पोटाने श्वास घेणे
नेहमी वर-वर श्वास घेणे ही चुकीची पध्दत आहे. श्वास नेहमी पोटाने घेतला पाहीजे. अशा प्रकारे श्वास घेणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील चांगले आहे.
जलद श्वास घेणे
जलद श्वास घेतल्याने कोशिकांपर्यंत योग्य प्रकारे ऑक्सिजन पोहचत नाही. यामुळे स्टड्ढेट-रेस्पॉनस सिस्टम जास्त सक्रिय होते. यामुळे रोग प्रतिकारक क्षमता कमी होते.
नियंत्रित करा
८० टक्के आजार हे तणावामुळे होतात. आंतरिक प्रणालीला श्वासाने नियंत्रित केल्यास शरीराचा प्रत्येक भाग चांगल्या प्रकारे काम करेल. म्हणूनच प्राणायाम केल्याने शरीराची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते.