आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रंगांचा मानवी जीवनावर सखोल प्रभाव पडत असतो. भिंतींना दिलेला रंग व्यक्तीचा स्वभाव, भावना, विचार आणि भुकेवरही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकत असतो, असे ओल्ड ग्रीनविचमधील रंग सल्लागार लेसली हॅरिंग्टन यांनी म्हटले आहे. म्हणूनच इंटेरिअर डिझाइन करतेवेळी मानवी मनोविज्ञानानुसार रंगाची निवड करावी, असे म्हटले जाते. याचा मानवी मनावर मोठा प्रभाव पडत असतो. याबाबतची माहिती जाणून घेतल्यास कोणत्या रंगाचा आपल्यावर कोणता परिणाम होतो हे समजू शकते.
हिरवा रंग स्वयंपाकघर आणि डायनिंग रूमसाठी चांगला आहे, पण फास्टफूड रेस्टॉरंटमध्ये याचा वापर टाळतात. हिरवा रंग निसर्गाशी संबंधित आहे. म्हणूनच याच्या संपर्कात येताच मनातील गदारोळ शांत होतो. हिरव्या रंगामुळे सॅलाड किंवा पोषक पदार्थ खाण्याची इच्छा बळावते. तर निळा रंग हा डायनिंग हॉलसाठी अजिबात योग्य नाही. कारण याच्यामुळे भूक मंदावते. निसर्ग चक्रात सुद्धा निळ्या रंगाची फळे, पालेभाज्या किंवा खाद्यपदार्थ नाहीत. याच कारणामुळे आपले मन या रंगाचा स्वीकार करत नाही. मात्र, जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी निळ्या रंगाच्या प्लेटमधून जेवण केल्यास चांगला परिणाम दिसून येतो.
तसेच तणावामुळे व्यक्ती अनेकदा जास्त खातो. परिणामी वजन वाढते. ही समस्या असल्यास राखाडी रंगाच्या प्लेटमध्ये जेवण करावे. हा रंग तणावग्रस्त लोकांची भूक आटोक्यात ठेवण्यात मदत करतो. जांभळ्या रंगाविषयी प्रत्येकाची वेगवेगळी प्रतिक्रिया असू शकते. कारण जांभळ्या रंगाच्या वस्तू सर्वांना आवडतात असे नाही. जांभळ्या रंगाची वांगी, भाज्या, फळे काहींना आवडतात तर काहीजण हे पदार्थ टाळतात.
स्वयंपाक घरात या रंगाच्या वस्तू वापरल्यास मांसाहारी लोकांची भूक वाढते, असे रंग तज्ज्ञ सांगतात. तसेच लाल रंग भूक वाढवणारा रंग म्हणून ओळखला जातो. यासाठीच डायनिंग हॉलमध्ये लाल रंग सर्वात चांगला मानला जातो. याचा परिणाम लाल रंगाप्रमाणेच असतो. हा रंग स्फूर्तीचे प्रतीक आहे. व्यक्ती या रंगाच्या संपर्कात येताच भूक वाढते आणि त्याच्या मेंदूतील रक्तसंचार वाढतो.
पिवळा रंग मूडवर सकारात्मक प्रभाव टाकतो तसेच याच्या संपर्कात येताच भूक वाढते. म्हणून इंटेरिअल डिझायनर रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जास्त करून पिवळ्या आणि नारंगी रंगाचा वापर करण्याचा सल्ला देतात.