‘वेपोरब’ कसे बनवतात माहित आहे का ? ‘हे’ आहेत काही जबरदस्त उपयोग

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वेपोरब माहित नाही, असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. कारण किमान लहानपणी तरी हे प्रत्येकाने वापरलेले असते. अनेक वर्षांपासून वेपोरब वापरात आहे. सर्दी, खोकला, ताप, अशा आजारात पूर्वीपासून ते वापरले जाते. याचा खुप लवकर परिणाम दिसून येतो. बंद नाक मोकळे करुन दीर्घ श्वास घेण्यास मदत होते. व्हिक्स वेपोरेब हे फक्त सर्दी खोकल्यासाठीच नाही तर अनेक समस्यांसाठी फायदेशीर आहे. व्हिक्स वेपोरबचे काही खास उपाय आपण जाणून घेणार आहोत.

असे तयार होते वेपोरब

वेपोरब बनविण्यासाठी अर्धा कप ऑलिव ऑइल किंवा खोबरे तेल, दोन टेबल स्पून व्हॅक्स, २० थेंब निलगिरी तेल, २० थेंब पुदीना तेल, १० थेंब रोजमेरीचे तेल, १० थेंब दालचीनी किंवा लवंग तेल, वापरले जाते.

बनवण्याची पद्धत

बेस व्हॅक्ससोबत ऑलिव ऑइल किंवा खोबरे तेल पातळ करून घ्या. यानंतर इतर सुगंधीत तेल त्यामध्ये मिसळून घ्या. शेवटी या मिश्रणात थोडे खोबरे तेल मिसळा. यानंतर ते डब्यात भरुन ठेवा आणि गरज पडल्यावर वापरा.

हे आहेत उपयोग

* घरातील मॉस्कीटो रिपेलेंट संपले असेल तर वेपोरबने डास पळवुन लावता येतात.

* झोपण्याआधी हात-पाय आणि उघड्या संपुर्ण शरीराला व्हिक्स लावा. यामुळे मच्छर जवळ येणार नाहीत.

* व्हिक्स लावल्याने पिंपल लवकर नष्ट होतात.

* डोकेदुखी कमी करण्यासाठी व्हिक्स लावणे फायदेशीर आहे. याचा गंध तनाव दुर करतो यामुळे दुखणे कमी होते.

* छोटी जखम झाल्यावर किंवा थोडे कापने यावर व्हिक्स लावा, जखम लवकर भरेल. हे त्वचेचे फंगल संक्रमण थांबवते.

* झोपण्याआधी डोके, नाक आणि गळ्याला व्हिक्स लावले तर झोप चांगली येते. कारण आपण ज्या भागांना व्हिक्स लावतो त्याला आराम मिळतो.

* जास्त खोकला येत असेल तर पायांच्या तळव्यांना व्हिक्स लावा. नंतर कॉटनचे मोजे घालुन झोपा. खोकला कमी होईल.

* याचा एक वेगळाच वापर तुम्ही करु शकता ते म्हणजे प्राण्यांच्या घाणीपासुन वाचण्यासाठी. घरातील कोणत्याही ठिकाणी प्राणी घाण करत असतील तेथे व्हिक्स लावा. या गंधामुळे प्राणी तेथे घाण करणार नाही.

* नखांना इन्फेक्शन होऊ नये म्हणुन तुम्ही व्हिक्स चा उपयोग करु शकता. मेनक्योर करतांना थोडा वेळ नखांना व्हिक्स लावा. यामुळे नखांना इन्फेक्शन होणार नाही.

* कान दुखत असेल तर कापसावर थोडे वेपोरब लावा आणि त्या जागेवर ठेवा. कानाचे दुखणे कमी होईल.

* दम्याचा त्रास होत असेल तर नियमित व्हिक्स लावा. दमा दुर होईल.

* पायांच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर दिवसातुन दोन वेळा व्हिक्स वेपोरब लावा.

* शरीरातील कोणत्याही स्नायुंमध्ये दुखत असेल तर व्हिक्स वेपोरब लावा.