आरोग्यनामा ऑनलाईन- थंड(cold )पदार्थ खाल्यानंतर नाकात किंवा घशात खाज येण्याची समस्या अनेकांना होते. रात्री झोपताना घशात कफ जमा झालेला असतो, यामुहे या समस्येचा सामना करावा लागतो. यासाठी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी सगळ्यात आधी घसा साफ करायला हवा. घश्यात कफ जमा होण्याची आणि थंड(cold ) खाल्यानंतर कानात खाज येण्याची कारण आणि उपाय जाणून घेवूयात…आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हे आहे कारण
घशात कफ जमा होण्याची समस्या अनेक वर्षांपर्यंत असेल तर कानाच्या नर्व्समध्ये मॉईश्चर जमा होते. त्यामुळेच नर्व्सला फंगस निर्माण होऊ शकतो. त्यानंतर काहीही खाल्यास कानांमध्ये खाज येते. हे प्रमाण वाढले तर अस्वस्थ वाटते. नाकातील हाडामुळेसुद्धा खाज येण्याची समस्या उद्भवते. अनेकदा अनुवांशिकतेमुळे सुद्धा ही समस्या होते.
हे उपाय करा
1 चहा किंवा गरम पाणी, सुप प्यायल्यामुळे आराम मिळू शकतो. यामुळे कान आणि घश्यातील नर्व्स शेकले जातात.
2 सर्वप्रथम थंड पदार्थांचे सेवन बंद करा. आईस्क्रिम, थंड पाणी असे थंड पदार्थ खाऊ नका.
3 आंबट पदार्थ खाऊ नका.
4 नाकातील हाडाच्या समस्येमुळे असे होत असेल तर डॉक्टरांकडून योग्य ती ट्रीटमेंट घ्या. यामुळे ही समस्या कमी होईल. गंभीर स्थितीत सर्जरी सुद्धा करावी लागते.
5 खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.