आरोग्यनामा ऑनलाईन टीम – (शलाका धर्माधिकारी )सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात महिलांना स्किनविषयीच्या अनेक तक्रारी असतात . स्किन लूज होणे, हट्टी टॅन, पुरळ, पिंपल्सचे डाग, निस्तेज त्वचा अशा अनेक समस्यांना संपवण्यासाठी आज आपण खालील टिप्स चा वापर करा. या टिप्स वर्किंग वूमनही करू शकतात.
असा करा कॉफीचा फेसपॅक :
१) कॉफी आणि साखर तळहातावर घेऊन चेहरा ओला करून गोलाकार स्क्रब करावा. कॉफी चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी परिणामकारी आहे. तर, साखरेने मृतपेशी निघून जाण्यास मदत होते . टॅन घालवण्यासाठी हा सर्वात कमी वेळ घेणार उपाय आहे .
२) मानेवर, हातावर आणि तळपायावर हट्टी टॅन तयार होते. त्यासाठी कॉफी आणि साखरेने स्क्रब केल्यानंतर लिंबाच्या सालीने गोलाकार मसाज करावा . हाताच्या कोपरांना, आणि गुडघे , घोटे देखील काळे पडले असतील तर या उपायाने मऊ आणि स्वच्छ त्वचा होते. आठवड्यातून २ वेळा हा कॉफी साखरेचा स्क्रब आणि लिंबाच्या सालीने मसाज करावा.
३) उन्हाळ्यात चेहऱ्यावर आलेल्या काळपटपणाला घालवण्यासाठी कॉफीच्या या फेसपॅकने खूप जलद परिणाम मिळेल . फेसपॅक तयार करण्यासाठी कॉफी मध्ये मध, १ चमचा लिंबाचा रस, एलोवेरा जेल घालून पेस्ट तयार करण्यासाठी गरजेनुसार गुलाब पाणी घालावे . हा पॅक १५ मी. चेहऱ्यावर ठेवल्याने स्किनच्या जुन्या समस्या देखील नष्ट होण्यास मदत होते.