आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Coconut Water And Diabetic Patients | मधुमेहींना गोड पदार्थ वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जातो; मग ते ड्रिंक असो की गोड फळ. मधुमेही रुग्णांना (Diabetic Patients) या सर्व गोष्टी टाळण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. जेणेकरून साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येईल. पण अनेक वेळा मधुमेहींच्या मनात काही गोष्टींच्या सेवनाबाबत शंका असते की, ते सेवन करावे की नाही किंवा याच्या सेवनाने साखरेची पातळी वाढेल का? (Coconut Water And Diabetic Patients)
त्याचप्रमाणे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये नारळाच्या पाण्याच्या सेवनाबाबत चिंता आणि शंका नेहमीच असते. नारळ पाणी (Coconut Water) पिण्याने शरीराला अनेक फायदे होतात हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे मधुमेही रुग्ण नारळपाणी सेवन करू शकतात का? मधुमेहाच्या रुग्णांना नारळपाणी पिण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. (Coconut Water And Diabetic Patients)
मधुमेही नारळपाणी पिऊ शकतात का?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नारळाच्या पाण्यात शून्य कॅलरीज असतात. याशिवाय, नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट, पोटॅशियम, आयर्न, मँगनीज आणि व्हिटॅमिन सी (Electrolyte, Potassium, Iron, Manganese, Vitamin C) सारखे अनेक पोषक घटक आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. नारळाचे पाणी चवीला गोड असले तरी त्यात कोणतेही आर्टिफिशियल स्वीटनर नसते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी नारळपाणी प्यायल्याने शुगर लेव्हल वाढत नाही.
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित (Blood Sugar Level Control) ठेवते नारळपाणी
नारळ पाण्याचे सेवन केल्याने अनेक रोगांचा धोका टळतो हे सर्वांना माहीत आहे. याशिवाय नारळपाणी प्यायल्याने मधुमेहाच्या रुग्णांची शुगर लेव्हल नियंत्रित राहते. वास्तविक, नारळाच्या पाण्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, ज्याच्या मदतीने शरीरात इन्सुलिन देखील तयार होते. त्यामुळे नारळ पाण्याचे सेवन मधुमेहींसाठी फायदेशीर मानले जाते.
मधुमेहींना इतक्या प्रमाणात प्यावे नारळपाणी
जर्नल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार,
जरी नारळ पाण्याचे सेवन मधुमेहासाठी फायदेशीर असले तरी त्यात फ्रक्टोज देखील असते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
त्यामुळे मधुमेही रुग्णांनी नारळाच्या पाण्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
आरोग्य तज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णाने दररोज 1 कप म्हणजेच 240 मिली पेक्षा जास्त नारळ पाणी पिऊ नये.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Coconut Water And Diabetic Patients | how does coconut water manage the sugar level in diabetic patients
High Cholesterol | पायावर दिसली ‘ही’ लक्षणे तर समजून जा की भयंकर प्रकारे वाढत आहे कोलेस्ट्रॉल लेव्हल
Kidney मध्ये समस्या असल्यास शरीर देऊ लागते 7 विचित्र संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात
Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार