‘नारळा’त आहेत ‘औषधी गुणधर्म’, अनेक आजार होतील बरे
हे आहेत नारळाचे फायदे
* नारळाचे तेल रोज त्वचेवर लावल्यास त्वचा सतेज होते. नारळाचा गर चेहऱ्यावर लावल्याने, चेहऱ्यावरील व्रण नाहिसे होतात.
* रात्री झोपताना चेहरा, मान आणि त्वचेवर खोबरेल तेल लावून हाताने हळूवार मसाज करावी. सकाळी उठल्यावर पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. काही दिवसातच सुरकुत्या नाहीशा होतात.
* गर्भवती महिलांनी रोज नारळाचा गर खाल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहते. सुदृढ बाळ जन्माला येते.
* खोबरेल तेलात बदाम बारिक करून टाकावे. डोके दुखीवर हे तेल रामबाण औषणीचे काम करते.
* अपचन, छातीत जळजळीचा त्रास असणाऱ्यानी नारळाचा गर सेवन केल्यास लाभ होतो.
* शीघ्रपतनाचा त्रास असणाऱ्या पुरूषांनी रोज सुखे खोबरे आणि गायीच्या दूध प्यायल्याने विशेष लाभ होतो.
* नारळातील व्हिटामीनमुळे ते पचनास फार लाभदायी आहे. पोट दूखत असल्यास किंवा गॅस झाल्यास नारळ पाणी प्यावे. नारळ पाण्याने उलटीही थांबते. पोटात जंत झाल्यास रोज सकाळी किसलेले खोबरे खावे.
* नारळ खोकल्यावर रामबाण उपाय असून नारळाच्या दूधात एक चमचा खसखस आणि एक चमचा मध मिसळून रोज रात्री पिल्याने खोकला बंद होतो. तोंडात फोड असल्यास ओले नारळाच गर खावा आणि जास्तीत जास्त नारळ पाणी प्यावे.