आरोग्यनामा ऑनलाईन- फ्रेश वाटावं आणि तरतरी मिळावी यासाठी आपण जास्त करून चहाचं सेवन करतो. यातही चहाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मसाला चहा, आल्याचा चहा, गवती चहा, ब्लॅक टी, लेमन टी असे विविध चहा पिणं लोक पसंत करतात. परंतु तुम्हाला लवंगाचा म्हणजेच लवंग चहा(Clove tea) माहित आहे का.
लवंग चहा आपल्या आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे. हा चहा(Clove tea) कसा केला जातो आणि याचे शरीराला कोणते फायद होतात याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
1) जर तुम्ही श्रमाचं काम करत असाल, किंवा आजारपणामुळं किंवा इतर काही कारणामुळं थकला असाल तर लवंगाच्या चहाचं सेवन करावं. यामुळं थकवा दूर होतो आणि आराम मिळतो.
2) या चहामुळं अॅसिडिटीचा त्रास दूर होता आणि अन्नपचन सुरळीत होण्यासही मदत होते.
3) दातदुखीचा त्रास असेल तर तो दूर होण्यास मदत होते.
4) किरकोळ ताप येण्याचा त्रास असेल तर लवंग चहा प्यावा.
5) सर्दी-खोकला दूर होतो.
6) डोकेदुखीपासून आराम मिळतो.
कसा कराल लवंग चहा ?
यासाठी खालील कृती करा-
– 4 ते 5 लवंगा घेऊन त्यांची बारीक पूड करा.
– चहा करताना पाणी ठेवल्यानंतर त्यात एक लहान चमचा ही पूड टाका
– हे पाणी 10 मिनिटे उकळून घ्या
– पाण्याला एक उकळी आल्यानंतर त्यात चहा पावडर आणि चहासाठीची इतर सामग्री टाकावी.
– आता तुमचा चहा तयार आहे. तुम्ही गाळून घेऊन त्याचं सेवन करू शकता.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.