आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सोसायटी अथवा घराच्या मुख्य पाण्याच्या टाकीत बॅक्टेरिया, व्हायरस हे वेगाने वाढतात. यामुळे अशा टाक्यांची आणि त्यात साठवलेल्या पाण्याची स्वच्छता आवश्यक असते. अन्यथा विविध प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात. अशा मोठ-मोठ्या टाक्या स्वच्छ करणे खुप अवघड असते. परंतु, अशी एक पद्धत आहे, ज्यामुळे मोठ्या टाकीची स्वच्छता काही मिनिटांत करता येते. यासाठी फक्त ब्लीचिंग पावडरची आवश्यकता असते. यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरस नष्ट होतात.
ही आहे पद्धत
* एक लीटर पाण्यामध्ये पाच मिलीग्रॅम ब्लीचींग पावडर टाका.
* टाकी एक हजार लीटरची असेल तर ४ ग्रॅम ब्लीचींग पावडर टाकावी.
* ब्लीचींग पावडरमधील क्लोरीनमुळे पाण्यातील बॅक्टेरिया, व्हायरस नष्ट होतात.
* ब्लीचींग पावडर १५ मिनिटे एका भांड्यात पाण्यात टाकून ठेवा. नंतर हे मिश्रण टाकीमध्ये टाका. यामुळे टाकीत शेवाळ होत नाही.