आरोग्यनामा ऑनलाइन – इनव्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीच्या मते, घरातील हवा की बाहेरील हवेपेक्षा जास्त दूषित असते. बाहेरील हवेच्या तुलनेत घरातील हवा पाचपट दूषित असल्याचं आढळून आलं आहे. साधारणता आपला असा समज असतो की, बाहेरील हवा ही दुषित असते. परंतु, असा भेदभाव करता येत नाही. ज्या घरात आपण राहतो, तेथील हवा सुद्ध दुषित असते. शिवाय, हे प्रमाण खूपच जास्त असू शकते. प्रदुषणाच्या गंभीर परिणामाचा आपण बाहेरच्या हवेत गेल्यानंतर विचार करतो. खरं तर आपल्या घरात सुद्धा अशाच प्रकारची दुषित हवा असते.
घरातील हवा स्वच्छ की अस्वच्छ ते ओळखण्यासाठी काही प्रयोग तुम्ही स्वता करू शकता. घराबाहेर असताना तुम्हाला चांगलं वाटतं हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. ज्यावेळी आपण घरात असतो, त्यावेळी अॅलर्जी किंवा इन्फेक्शन झाल्यासारखं वाटत असेत तर घरातील वातावरण यास कारणीभूत असू शकतं. घरात प्रदूषण असेल तर अशा समस्या जाणवतात. ओलाव्यामुळे बुरशीची निर्मिती होते. मात्र जर तुमच्या घरात बुरशी आढळून आली तर तुमच्या घरातील हवा स्वच्छ नसल्याचं समजा. बुरशी शोधण्यासाठी पूर्ण घर तपासण्याची गरज नाही. तर घरातील वासावरूनही घरात बुरशी आहे की नाही ते समजतं.
घरात घाण वास येत असेल, तर याचा अर्थ घरातील हवा चांगली नाही. कोणत्याच एअर फ्रेशनरमुळे अशा वासाला दूर करता येत नाही. घरातील हवा चांगली सल्यास वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा हवेमुळे डोकेदुखी, थकवा, चक्कर, अगदी डिप्रेशनही येऊ शकतं. डोळे आणि त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकता. अति विषारी घटक असलेल्या हवेत श्वास घेतल्यानं काही वर्षांनंतर श्वसनामार्गाच्या समस्या, हृदयाचे आजार आणि कॅन्सर यासारखे आजारही होऊ शकतात. घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. जेणेकरून हवा आत येईल आणि घरातील प्रदूषित असलेली हवा बाहेर जाण्यास मदत होईल. यामुळे घरातील दुर्गंधीही दूर होईल. धूम्रपान तसंच घर स्वच्छ करण्याची काही उत्पादनं वापरणं टाळा. यामध्ये मोठ्या प्रमाणात विषारी घटक असतात. त्यामुळे घरातील हवा प्रदूषित होते. हवा शुद्ध करणारी झाडं घरात लावता येतील. ज्यामुळे घरातील हवा स्वच्छ राहते.