आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जर तुम्ही वाढत्या कोलेस्ट्रॉल (Cholesterol) च्या समस्येने त्रस्त असाल तर अक्रोड (Walnuts) तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की सर्व ड्रायफ्रूट (Nuts) मध्ये हृदयाला (Heart) फायदा देणारे घटक असतात. अक्रोड हे त्यापैकी सर्वोत्तम मानले जाते. कारण त्यात ओमेगा -3 फॅटी अॅसिड (Omega-3 Fatty Acid) चे प्रमाण जास्त असते (Cholesterol).
अक्रोडमध्ये ऑलिक अॅसिड (Oleic Acid) सारखे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड (Polyunsaturated Fatty Acid) असते, तसेच अल्फा-लिनोलेनिक अॅसिड (Alpha-Linolenic Acid) सारख्या ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा भरपूर स्रोत असतो. हे हेल्दी फॅट नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी करतात.
गुड कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) आणि बॅड कोलेस्ट्रॉलचे (Bad Cholesterol) गुणोत्तर सुधारते. याशिवाय अक्रोडमध्ये फायबर (Fiber) असते जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यामुळे, ते लिव्हरद्वारे रक्तातील कोलेस्टेरॉलचे शोषण वाढवते.
मधुमेही रुग्णांसाठी फायदा (Beneficial For Diabetic Patients)
एका अभ्यासात असे समोर आले आहे की, रोज अक्रोड खाल्ल्याने टाईप 2 मधुमेहाच्या (Type 2 Diabetes) रुग्णांमध्ये 10 टक्के कोलेस्ट्रॉल कमी होते.
हे 30 ग्रॅम अक्रोड खाल्ल्याने होते. यामुळे शरीरातील एचडीएल (HDL) ची पातळीही वाढते आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
दूर करा केसांची समस्या (Get Rid Of Hair Problems)
तसेच, केसांची काळजी घ्यायची असेल तरी अक्रोड खा. यामध्ये व्हिटॅमिन बी7 (Vitamin B7) असते जे तुमचे केस मजबूत करते,
गळणे थांबवते आणि केस लांब करते.
याशिवाय हा सुकामेवा तणावही दूर करतो. यामध्ये असलेले पोषकतत्व, फायबर (Fiber),
अँटिऑक्सिडंट्स (Antioxidant) आणि फॅटी अॅसिड्स (Fatty Acid) तणावाशी लढण्यास मदत करतात.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Cholesterol | walnuts for cholesterol lowering food nuts diabetes heart disease omega 3 fatty acids
Dental Care | दाताच्या वेदनांनी असाल त्रस्त तर ‘हे’ 5 आयुर्वेदिक उपाय अवलंबा, जाणून घ्या सविस्तर
Coffee Benefits | कॉफी पिण्याने कमी होतो ‘या’ आजारांचा धोका! जाणून घ्या किती कप पिणे आहे लाभदायक