आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Cholesterol Symptoms | प्रत्येकाला निरोगी आणि दीर्घायुष्य जगायचे असते. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक आजार अकाली जडतात. आपले शरीर आपल्याला आधीच काही संकेत देत, जेणेकरून आपण सावध व्हावे. शरीराने दिलेले संकेत समजून घेतल्यास कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर समस्या टाळता येतात. रक्तातील हाय कोलेस्ट्रॉल (High cholesterol) ही धोक्याची घंटा आहे. (Cholesterol Symptoms)
त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, (High Blood Pressure, Heart Attack,) कोरोनरी आर्टरी डिसीज, ट्रिपल वेसल डिसीज यांसारखे आजार होण्याची भीती असते. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यावर शरीर कोणते संकेत देते ते जाणून घेऊया.
1. पाय सुन्न होणे (Numbness in legs)
कोलेस्ट्रॉल वाढले की पाय अचानक सुन्न होतात. शिरांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे पायांना होणारा रक्तपुरवठा थांबतो किंवा कमी होतो. (Cholesterol Symptoms)
2. हृदयविकाराचा झटका (Heart Attack)
हृदयविकाराचा झटका हे हाय कोलेस्ट्रॉलच्या धोकादायक लक्षणांपैकी एक आहे. प्रथम, रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यामुळे, दाब वाढू लागतो, जो नंतर हृदयविकाराच्या झटक्याचे कारण बनतो.
3. उच्च रक्तदाब (High Blood Pressure)
उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी दर्शवतो. हे शोधणे सोपे आहे. तुमचा बीपी वेळोवेळी तपासत राहा.
4. नखांचा रंग बदलणे (Nail Color Change)
रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढले की रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नखांचा रंग पिवळा होऊ लागतो.
5. अस्वस्थता
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की चिंता वाढते. यासोबतच श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ होणे, थकवा येणे, छातीत दुखणे असे प्रकार जाणवतात. अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Cholesterol Symptoms | bad high cholesterol symptoms and causes numbness nail colour change heart attack high blood pressure
Love Hormone | ‘या’ 5 गोष्टी खाल्ल्याने वाढेल Oxytocin, प्रेम करण्याची इच्छा होईल आणखी जास्त