आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वॅक्स करणे आता सहज गोष्ट झाली आहे. अशा या वॉक्समध्येही विविध प्रकार आज काल पाहायला मिळतात. त्यातला एक प्रकार म्हणजे चॉकलेट वॅक्स चला मग जाणून घेऊ चॉकलेट वॉक्सचे फायदे
त्वचा मुलायम राहते
चॉकलेट वॅक्स मध्ये असणाऱ्या घटकांमुळे त्वचा नेहमी मुलायम राहते. तसेच चॉकलेट वॅक्स मध्ये त्वचेसाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असतात. जे त्वचेसाठी लाभदायक असतात. या वॉक्समध्ये असणाऱ्या विविध तेलांमुळे त्वचा चमकदार बनते. आणि चॉकलेट वॉक्समुळे त्वचेला नैसर्गिक तजेला मिळतो.
हातावर, पायांवर पडलेल्या डागा चॉकलेट वॉक्सने नाहीशा होतात. चॉकलेट वॅक्स डाग हटवण्यासोबत त्वचेला लकाकी देते. चॉकलेट वॉक्समुळे रक्त प्रवाहही सुरळीत चालते. कारण चॉकलेट वॉक्सने त्वचा जास्त ओढली जात नाही. अशातच पावसाळ्यात चॉकलेट वॅक्स हे बाकी वॉक्सच्या तुलनेत उत्तम असते.
वेदना होतात कमी
पावसाळ्यात त्वचेवर ओलावा असल्याने त्वचा नेहमी चिकट असते. त्वचा चिकट असल्याने त्वचेवरील केस निघण्यास अडथळा निर्माण होतो. म्हणूनच पावसाळ्यात इतर वॉक्सच्या तुलनेत चॉकलेट वॅक्स करताना वेदना काम होतात. चॉकलेट वॉक्सच्या चिकटपणामुळे केस अगदी सहज निघतात.
चॉकलेट वॉक्समध्ये असणाऱ्या घटकांमुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा तजेलदार दिसते. पावसाळ्यात वातावरणात ओलावा अधिक असल्याने त्वचा तेलकट आणि चिकट राहते. अशा स्थितीत चॉकलेट वॅक्सिंग हा एक योग्य पर्याय ठरतो. कोको, सोयाबीन तेल, बदामाचे तेल, ग्लिसरीन, व्हिटॅमिन आणि ऑलिव्हऑइल आदींच्या मिश्रणाने चॉकलेट वॅक्सिंग तयार केले जाते. त्यामुळे ते त्वचेसाठी उपयुक्त ठरते.