आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Chinese Tapping Therapy | शरीराच्या काही भागांना बोटाने दाबून वजन कमी करता येऊ शकते. या तंत्राला EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक (emotional freedom technique) म्हणतात. टॅपिंग थेरेपी वजन कमी करण्यासाठी उपयोगी मानली जाते (Chinese Tapping therapy for Weight Loss). काही न्यूज रिपोर्टनुसार या फॉर्म्युलाद्वारे अनेक लोकांनी 5 महिन्यात सुमारे 30 पौंड म्हणजे सुमारे 13 किलो वजन कमी केले आहे.
काय आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक?
द टॅपिंग सोल्यूशनच्या लेखिका जेसिका ऑर्टनर (Jessica Ortner, author of Tapping Solution) म्हणतात, EFT एक स्ट्रेस रिलीफ टेक्निक (stress relief technique) आहे जी सायकोलॉजी आणि चीनच्या प्राचीन अॅक्यूप्रेशर थेरेपीचे (Chinese Tapping Therapy) संमिश्र रूप आहे.
स्ट्रेस हार्मोनची लेव्हल कमी होते
हे तंत्र शरीरात कोर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची लेव्हल कमी करते, जे एन्जायटी, वजन वाढवणे किंवा झोपेसंबंधी समस्या वाढवण्याचे काम करते. या टॅपिंग टेक्निकने वजन कमी होते, तसेच स्ट्रेस आणि झोपेच्या समस्या सुद्धा कमी होतात.
9 विशेष ठिकाणांवर 5-7 वेळा फिंगर टॅपिंग
टॅपिंग टेक्निक लोकांना नकारात्मक भावनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित करते. जसे की एखादी न सुटलेली समस्या किंवा एखादी अशी गोष्ट ज्यासाठी व्यक्ती चिंतेत आहे. या दरम्यान शरीराच्या 9 विशेष ठिकाणांवर 5-7 वेळा फिंगर टॅपिंग केले जाते आणि एखाद्या विशेष मुद्द्यावर केला जातो. शरीराच्या या भागांना मेरिडियन पॉईंट म्हटले जाते.
–
किती उपयोगी आहे हे तंत्र?
काही स्टडीज टॅपिंगला स्ट्रेस कमी करण्याचे तंत्र मानतात. 2020 मध्ये अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनमध्ये प्रकाशित एका स्टडीचे मुल्यांकन केले होते. यामध्ये टॅपिंग थेरेपीने 60 मिनिटे अगोदर आणि नंतर वॉलिटियर्सची स्ट्रेस लेव्हल चेक करण्यात आली होती. EFT च्या नंतर तज्ज्ञांना एन्जायटी, डिप्रेशनसह अनेक लक्षणांमध्ये सुधारणा दिसून आली.
टॅपिंग करणे सुरक्षित आहे का?
टॅपिंगद्वारे स्ट्रेस कमी करणे हानिकारक नाही. असे करणे एकदम सुरक्षित आहे. परंतु टॅपिंगने वजन कमी करण्यावर कोणतेही संशोधन झालेले नाही, यासाठी याबाबत सध्या कोणताही दावा केला जाऊ शकत नाही. (Chinese Tapping Therapy)
न्यूट्रिशन आणि फूडचा उल्लेख नाही
यामध्ये सर्वात महत्वाची बाब ही आहे की, ईएफटीमध्ये कुठेही न्यूट्रिशन आणि फूडबाबत सांगण्यात आलेले नाही.
तज्ज्ञ सांगतात की, वजन कमी करण्याच्या कोणत्याही पद्धतीसह न्यूट्रिशनची समज, खाण्यात योग्य वस्तूंचा पर्याय,
हेल्दी कुकिंग टेक्निक आणि पोर्शन साईज माहित असणे आवश्यक असते.
Web Title :- Chinese Tapping Therapy | weight loss this chinese tapping therapy help you to lose weight
Dengue Fever | डेंग्यूचा ताप कधी होतो घातक? ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
Diet tips | अकाली वृद्धत्व टाळायचे असेल तर अतिशय कमी प्रमाणात खा ‘हे’ 10 पदार्थ; जाणून घ्या