आरोग्यनामाऑनलाईन- वजन कमी करणे, हृदयाच्या समस्या दूर करणे तसेच सायनसवर हिरवी मिरची गुणकारी असल्याचे बोलले जाते. परंतु, आता मिरची फुफ्फुसांचा कॅन्सर रोखण्यासाठीही फायदेशीर ठरते. असा दावा संशोधकांनी केला आहे. एका संशोधनातून असा दावा या अभ्यासकांनी केला आहे.
एक्सपेरिमेंटल बायॉलजीमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.या संशोधनात म्हटले आहे की, मिरचीमध्ये कॅपलाइसिन हे कंपाउंड आहे. या कंपाउंडमुळे लंग कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते. पुरूष आणि महिलांमध्ये लंग कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातही पुरूषांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
यासंबंधी केलेल्या संशोधनाकडे लंग कॅन्सरवर उपाय म्हणून पाहता येऊ शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे. यासंबंधी प्रयोग करताना संशोधकांनी मनुष्याचे नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर सेल्सना कल्चर केले. यावेळी असे दिसून आले की, कॅपसाइसिन नावाच्या कंपाउंडने कॅन्सर पसरवण्याची प्रक्रिया मेटास्टेसिसला पहिल्याच स्टेजवर रोखले. संशोधकांनी उंदरांवरही हा प्रयोग केला. उंदरांना कॅपसाइसिन रिच डाएट देण्यात आले असता असे दिसून आले की, त्यामध्ये मेटास्टेटिक कॅन्सर सेल्सची संख्या त्या उंदरांच्या तुलनेत फार कमी होती. ज्यांच्यावर परिक्षण करण्यात आले नव्हते.
या संशोधनातून असे समजले की, कॅपसाइसिन कंपाउंड डील प्रोटीनलाही सक्रिय होण्यापासून रोखण्यास मदत करतो. हे प्रोटीन कॅन्सर सेल्स पसरवणे आणि वाढीसाठी मदत करतात. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या मिरचीचा डाएटमध्ये केला जाऊ शकतो. पुरूषांनी हिरव्या मिरचीचा आहारामध्येसमावेश केला पाहिजे. कारण हे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात. हिरव्या मिरचीत अॅन्टी-ऑक्सिडंटही मुबलक असल्याने ब्लड सर्कुलेशनही व्यवस्थित होते.