लहान मुलांचे अतिवजन असेल तर घ्या ‘अशी’ काळजी
आरोग्यनामा ऑनलाईन – मूल लहान असताना त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते खास करून त्यांच्या खाण्या पिण्याकडे योग्य लक्ष द्यावे लागते. आजच्या काळात लहान मुलांना घरातील अन्न कमी पण बाहेरचे अन्न खाण्याची खूप आवड असते. त्याचबरोबर खेळणे कमी आणि खाणे जास्त त्यामुळे लहान मुलांचे वयाच्या मानाने जास्त वजन वाढते. त्याचबरोबर अनेकांना असे वाटते की, आपले बाळ तब्बेतीने छान असावे पण ते काही मर्यादेपुरतेच ठिक वाटते. लहान मुलांची तब्बेत जर दिवसेंदिवस वाढत असेल. तर त्यांना काही काळानंतर त्रास होऊ लागतो. मग त्यामुळे लहान मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आज जगात २७ टक्के पेक्षा जास्त मुले स्थुल आहे. जर आपल्याला लहान मुलांना स्वस्त आणि निरोगी ठेवायचे असेल तर त्यांची वेळोवेळी काळजी घेणे गरजेचे आहे. काळजी कशी घ्यावी हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
लहान मुलांच्या आहाराचे नियोजन करणे गरजेचे आहे. कारण लहान मुलांना काही समजत नसते त्यामुळे त्यांचे खाण्यावर नियंत्रण नसते. अशा वेळी आपण त्यांना बाहेरचे फास्ट फूड खाण्यास बंदी करणे गरजेचे आहे. आपण मुलांना आवडेल ते जेवण घरामध्ये बनवून दिले पाहिजे. यामुळे मुले घरातली जेवण आवडीने खातील. खाण्यामध्ये त्यांना फळे, दही, जॅम, सॉस पालेभाज्या खायला द्याव्यात किंवा त्यांना हे खाण्याची गोडी लावावी. मुलांना तळलेले पदार्थ खाऊ देऊ नका. त्याचबरोबर आहारात साखर, तांदूळ, मैदा, चीज याचा वापर कमी करावा.
यासोबतच त्यांना फळांचा रस किंवा लिंबाचा रस द्यावा. हिरव्या पालेभाज्या खाण्याची सवय लावावी. तुम्ही त्यांना रोज ५०० ते ७०० मि.ली दूध मुलांना प्यायला देऊ शकता. त्याचबरोबर मुलांना रोज नाही तर आठवड्यातून दोन वेळा जेवणामध्ये गोड पदार्थ द्या. त्याचबरोबर मुलांना इलेक्ट्रॉनिक वस्तुपासून लांब ठेवा. उदा. मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप आदी गोष्टींपासून लांब ठेवा. त्यांना जास्त स्क्रिनवर जास्त पाहू देऊ नका.
सारखे लहान मुलांना घरात बसवण्यापेक्षा बाहेर खेळायला सोडा. कधी-कधी तुम्ही ही आपल्या मुलांसोबत खेळा त्यांना आनंदी ठेवा त्यांच्याशी प्रेमाने वागा. मुलांचा दिनक्रम बनवा. बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेटसारखे खेळ खेळायला सांगा तसेच एरोबिक्स, पोहणे, सायकलिंग, नृत्य करणे आदी गोष्टींचा समावेश मुलांच्या दिनक्रमात करावा.
स्वयंपाकात कोणते पदार्थ बनवावे यासाठी मुलांना विचारा. त्यांनी सांगितलेले पदार्थ बनवा. यामुळे लहान मुले जेवण आवडीने खातात. लहान मुले अयोग्य खाण्याचा हट्ट करत असतील तर त्यांना लगेच रागावू नका. उलट तुमच्यासाठी मुलांना पोषणमुल्यांबाबत योग्य ज्ञान देण्याची ही संधी आहे, असे समजा.