आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मुलांच्या शारीरीक आणि मानसिक विकासाठी त्यांना पोषक आहार देणे खुप गरजेचे असते. आहारात त्यांना नियमित एक अंडे दिल्यास त्यांची वाढ चांगल्याप्रकारे होऊ शकते. अंड्यात भरपूर पोषक घटक असल्याने आरोग्यास त्याचा फायदा होतो, असे यावर संशोधन करणारे अमेरिकेतील सेंट लुईस वॉशिंग्टन विद्यापीठाचे लोका आयनोटी यांनी म्हटले आहे.
काय म्हणतात शास्त्रज्ञ
१) अंडी खाल्ल्याने मुलांची प्रकृती जास्त सुधारते.
२) रोज अंडी सेवन केल्याने त्या त्या वयात शरीराची जेवढी वाढ होणे अपेक्षित असते ती घडून येते.
३) मुलांचे साखर खाण्याचे प्रमाणही कमी होते.
४) अंडी हे गरिबांनासुद्धा परवडणारे अन्न आहे.
५) अंड्याची अॅलर्जी असल्यास ते खाऊ नये.
६) अंडी सेवनाचा मुलांवर जास्त आणि लवकर चांगला प्रभाव दिसून येतो.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)