आरोग्यानामा ऑनलाईन टीम – आपली मुले बुध्दमान आणि हुशार असावीत असे प्रत्येक आई-वडीलांना वाटत असते. परंतु, सध्या आई-वडीलांकडे वेळ कमी असल्याने ते मुलांची योग्य देखरेख करू शकत नाहीत. याचा परिणाम मुलांच्या शारीरीक आणि बौद्धीक वाढीवर होत असतो. परंतु, मुलांना काही निवडक योगसन करण्यास सांगितल्यास ही समस्या दूर होऊ शकते. मुलांनी रोज ही योगासन केल्यास त्यांची बौद्धीक वाढ चांगली होऊ शकते. याबाबत अधिक माहिती आपण घेणार आहोत.
भुजंगासन
हे करण्यासाठी पोटावर सरळ झोपा. दोन्ही हात अंगाला चिटकवून ठेवा. श्वास घेऊन डोके, खांदे आणि छाती वर उचला. श्वास सोडत पुन्हा खाली या. या आसनाने हाताच्या मासपेशी मजबूत होऊन मुलांना लेखन करणे सोपे होते. मणक्याचे हाड आणि पाठ मजबूत होते. पचनक्रिया चांगली होऊन फुफ्फूस मजबूत होतात.
त्रिकोणासन
सरळ उभे राहून श्वास आत घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवत श्वास सोडा. दोन्ही हात वर उचलून डाव्या बाजूला वाका. उजव्या हाताने डाव्या पायाल स्पर्श करा. थोडा वेळ याच अवस्थेत राहा. पुन्हा पहिल्या पोझिशनमध्ये या. हीच क्रिया उजव्या बाजूनेही करा. यामुळे हात, पाय, हिप्स, मनक्याचे हाड, छाती मजबूत होते. हे नव्र्स सिस्टम चांगली होते.
ओम उच्चारण
हे करण्यासाठी सुखासनमध्ये बसावे. हात ज्ञानमुद्रेत ठेवा किंवा दोन्ही हाताचे तळवे प्रार्थना मुद्रेत जोडा. दिर्घ श्वास घ्या आणि ओम उच्चारण करत दिर्घ श्वास घ्या. असे ३-४ वेळा करा. ओम उच्चारण केल्याने मस्तिष्कमधील रक्तप्रवाह वाढतो. लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढते.
भ्रामरी
हे आसन करण्यासाठी सुखासनमध्ये बसा. डोळे बंद करा आणि कानात बोट घालून तोंड बंद करुन घशातून भुंग्यासारखा आवाज काढा. भ्रामरी आसन राग आणि थकव्यामुळे होणारा तणाव कमी करते. व्होकल कॉड्र्स मजबूत होतात. झोप चांगली येते. बॉडीचे टिश्यूज हील होतात.