आरोग्यनामा ऑनलाईन- मुलांना(children ) व्हिटॅमिनयुक्त आहार देण्याची गरज आहे. मुलांच्या(children ) आहारात व्हिटॅमिन बी 6 समृद्ध पदार्थ समाविष्ट करा. त्यामुळे मूल तंदुरुस्त राहील. व्हिटॅमिन बी 6 च्या अभावामुळे शरीरात आळस येतो. व्हिटॅमिन बी 6 रोगप्रतिकारक पेशी तयार करतात. केळी, मासे यात व्हिटॅमिनयुक्त बी 6 भरपूर असते.
व्हिटॅमिन सी शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. मूल आजारी पडणार नाही आणि सक्रिय राहण्यासाठी आहारात फळे आणि व्हिटॅमिन सी समृध्द पदार्थ समाविष्ट करा. यासाठी जेवणामध्ये तुम्ही लिंबूवर्गीय फळं जसे संत्री, आवळा समाविष्ट करा. शरीराचे विषारी पदार्थांपासून संरक्षण करण्यासाठी मुलांच्या आहारामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन ई अवाकाडो, बदाम, सूर्यफूल बियाणे इ. मध्ये भरपूर प्रमाणात आढळते.
मुलांची हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे, कारण व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषण्यास मदत करते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलास शरीरात थकवा जाणवू शकतो. जो शारीरिक वाढीस बाधा आणतो. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध अशा दुग्ध उत्पादने, अंडी आणि मासे आदीचा समावेश करा.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.