लठ्ठपणामुळे लहान मुलही होऊ शकतात उच्च रक्तदाबाचे ‘बळी’

fat-boy

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन : २१ व्य शतकात लठ्ठपणा ही जागतिक समस्या झाली आहे. आणि ही समस्या वर्षानुवर्षे वाढतच चालली आहे. आणि लहान मुलांनाही लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आणि लहान मुलांमध्ये हि समस्या खूप वाढत आहे. या समस्येमुळे लहान मुलांना उच्च रक्तदाब या आजरालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लहान मुलांचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

*लहान मुलांचे वजन वाढू नये म्हणून हे करा *

१) स्रियांनी गर्भधारणा होण्याच्या अगोदर स्वतःचे वजन कमी करावे. असे केले नाही तर जन्माला येणारे बाळही लठ्ठ होते. त्यामुळे बाळ लठ्ठ होऊ नये म्हणून हि काळजी घ्यावी.

२) गर्भावस्थेत स्रियांनी पौष्टीक आहार घ्यावा. जेणेकरून बाळाचे स्वास्थ चांगले राहील.

३) मूल लहान असतानाच त्यांना शारीरिक खेळ खेळायला लावणे. कारण सध्या मुलं मोबाईल आणि टीव्हीमुळे बाहेर खेळायला जात नाहीत.  त्यामुळे सध्या मुलांमध्ये लठ्ठपनाची समस्या वाढत आहे.

४) मुलांना जबरदस्ती खायला घालू नका. त्यांना थोडं थोडं खायला द्या. एकच वेळेस सगळं खाऊ घालू नका जेणेकरून मुलांमधील लठ्ठपणा वाढणार नाही.

५) मुलांना खूप पाणी पाजा. ताज्या फळांचा ज्युस प्यायला द्या. आणि कोल्ड्रिंक्स पासून लांबच ठेवा.

६) मुलांना फास्टफूड खायला देऊ नका.आणि सकाळचा नाष्टा अवश्य द्या.असे केल्यास तुम्ही मुलांना लठ्ठपणा पासून दूर ठेऊ शकता.