कांजण्यांवर करा ‘हे’ घरगुती उपाय !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कांजण्या हा आजार व्हेरिसेला झोस्टर नावाच्या विषाणूमुळे होतो. १५ वर्षाच्या वयोगटापर्यंतच्या मुलांना एकदा तरी हा आजार होतो. जानेवारी ते मे महिन्यादरम्यान म्हणजेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा आजार होतो. संपर्कांतून होणारा आजार असून जंतुसंसर्ग प्रामुख्याने २ दिवस आधी किंवा ६ दिवसापर्यंत त्वचेची लक्षणे दिसू लागतात व १० ते २१ दिवसांत हा आजार होतो.

सुरुवातीस सतत ताप येणे, डोकेदुखी, मरगळ, कमी भूक लागणे तसेच हलकेसे पॉट दुखणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे तीन चार दिवस दिसून येतात. त्वचेवर लाल रंगाची अत्यंत खाजवणारी वेदनादायी पुरळ, पुळ्या, फोड आलेले व्रण दिसायला लागतात. प्रथमतः पाठीवर, छातीवर, खांद्यावर व त्यांनंतर चेहरा, डोके व हातापायांवर व्रण येतात. हे फोड विभिन्नप्रकारचे असतात. अंगात ताप भरल्यानंतर फोड वाढतात. त्यानंतर फोड कोरडे पडतात. या त्रासदायी आजारावर मात करण्यासाठी घरगुती उपाय आहेत ते केल्याने त्रास नक्कीच कमी होईल.

१) बेकिंग सोडा 
कांजण्यांच्या डागांवर बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करून लावल्याने आम्लता आणि क्षारता टिकून राहते त्यामुळे अंगावरची सूज आणि खाज दूर होते.


२) ओट्स
ओट्स मध्ये फायबर असल्याने लोक ओट्स खाणे जास्त पसंद करतात. परंतु हे ओट्स पाण्यात भिजू घालून डाग आलेल्या ठिकाणी लावल्यास डाग कमी होण्यास मदत होते.


३) मध
मध हे नैसर्गिकरित्या मॉइश्चराइजर असल्याने ते शरीरावर लावल्याने नवीन कोशिका बाहेर निघण्यास मदत होते त्याचबरोबर हे ओट्स सोबत लावल्यास डाग कमी होऊ शकतात.


४) पपई 
पपई पचनक्रियेस जेवढे उत्तम तेवढेच कांजण्यांच्या डागावर गुणकारी आहे. ब्राऊन शुगर आणि दुधात मिक्स करून लावल्याने आराम मिळतो.


५) नारळपाणी 
नारळपाण्यात खनिजे तसेच विविध व्हिटॅमिन्स असल्याने हे प्यायल्याने किंवा शरीरावर लावल्यानेही कांजण्यांचे डाग दूर होतात.