वजन कमी करण्यासाठी ‘या’ सरबताचा उपयोग करा
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय कधीही चांगले. या उपायामुळे कोणतेही नुकसान होत नाही. शिवाय, घरात उपलब्ध वस्तूंपासून असे उपाय अगदी सहज करता येतात. असाच एक उपाय म्हणजे सब्जाचा सरबत होय. उन्हाळ्यात अनेकजण सरबतामध्ये सब्जाचा वापर करतात. परंतु, सब्जा आपल्या शरीरासाठी किती उपयोगी आहे, त्याचे किती फायदे आहेत.याविषयी अनेकांना माहिती नसते. सब्जा प्रोटीनचे एक उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये फायबर, ओमेगा-३ फॅट्स मुबलक असते. जे मेटाबॉलिज्मला बूस्ट करण्यासाठी, भूक शांत करण्यासाठी आणि फॅट्स बर्न करणारे मोठे हार्मोन्स म्हणजेच, ग्लूकागोन वाढवतात.
त्यामुळेच सब्जा वजन कमी करण्यासाठी खुपच उपयुक्त आहे.दररोज ३० ग्रॅम फायबरचे सेवन केल्यास वजन वेगाने कमी होते. २ चमचे सब्जामध्ये १० ग्रॅम फायबर असते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. याच बहुगुणी सब्जाच्या सरबताविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. वजन कमी करण्यासाठी सब्जाचा सरबत बनविण्यासाठी एक कप पाणी, एक चमचा सब्जा, दोन चमचे लिंबाचा रस, दोन चमचे मध एवढे साहित्य लागते. सरबत तयार करण्यासाठी प्रथम एक कप पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा सब्जा रात्रभर भिजत ठेवावा. सकाळी त्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळून रिकाम्यापोटी त्याचे सेवन करावे.
मध-लिंबाचा रस न टाकताही याचे सेवन करता येते. हा सरबत प्यायल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत काहीही खावू नये. या सरबतामुळे वजन कमी होतेच शिवाय अनेक फायदे होतात. हे सरबत सलग प्यायल्यावे १५ दिवसांमध्ये २ ते ४ किलो वजन कमी होऊ शकते. यासोबत थोडा व्यायाम करावा. तसेच आहारात गोड, तळलेले पदार्थ घेऊ नयेत. वजन कमी करण्याबरोबरच सब्जाच्या अन्य फायदेही आहेत. याच्या नियमित सेवनाने इनफ्लामेशन म्हणजेच सूज कमी होते. ही सूज शरीराच्या अनेक समस्यांचे कारण ठरू शकते. तसेच सब्जामध्ये ओमेगा-३ मोठ्या प्रमाणात असल्याने हृदय किंवा कोलेस्ट्रोल संबंधी समस्या दूर होतात.
सब्जाच्या बियांमध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असल्याने शरीरामधून फ्री रॅडीकल्स बाहेर टाकले जातात. या फ्री रॅडिकल्सचा थेट संबंध हृदयरोग, कॅन्सरशी होऊ शकतो. शिवाय सब्जा शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवतो. यामधील लोह, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअममुळे ताकद वाढते.