आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वाढत्या वयासोबत निमोनिया होणे ही सामान्य गोष्ट आहे. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने ज्येष्ठांना हा आजार होऊ शकतो. डायबिटीजच्या ज्येष्ठ रूग्णांना ही समस्या होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. यामुळे छातीमध्ये इन्फेक्शन होते.
ही आहेत कारणे
* रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने हा आजार होतो.
* धुम्रपानामुळे लंग्ज खराब होतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती आणखी कमी होते.
ही आहेत लक्षणे
१) अत्याधिक प्रमाणात कफ जमा होणे. कफचा रंग बदलणे.
२) छातीमध्ये एका बाजूला त्रास होणे. श्वास घेताना त्रास वाढणे. छातीवर दबाव येणे.
३) थंडी वाजवून येणे. १००.४ फॅ. पेक्षा जास्त ताप येणे. हा पहिला संकेत आहे.
४) फुप्फुसामध्ये इन्फेक्शन होऊ लागताच’ श्वास घेण्यास त्रास होणे.
अशी घ्या काळजी
* इन्फ्लूएंजाचे इंजेक्शन प्रत्येक वर्षी घ्या.
* नेमोवेकचे इंजेक्शन लहान मुलांना द्यावे. ६५ वयानंतर पुन्हा घ्यावे.
* थंडीपासून तसेच एसीपासून दूर राहावे. थंडीच्या दिवसांत काळजी घ्या.
* बस, रेल्वे, थिएटर आणि जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.