व्हिएतनामी काँग्रेसच्या योद्ध्यांनी ज्या जंगलांत आश्रय घेतला होता, ती दाट जंगले एजन्ट ऑरेंजमुळे विरळ झाली. तसेच या देशाच्या काही भागांतली पिकेही या तणनाशकामुळे नष्ट झाली. असे असले तरी, या तणनाशकातील डायऑक्सिनमुळे व्हिएतनामी आणि अमेरिकी सैनिकांना प्रारंभिक बाधा झाली.
एजन्ट ऑरेंज आणि डायऑक्सिनबाबतचे यासंदर्भातील संशोधन हे प्राथमिकदृष्ट्या वैद्यकीय स्वरूपाचे आहे. यात आम्ही या रसायनांचा त्वचेशी संपर्क आल्याने मानवावर होणारा परिणाम आणि अमेरिकी सैनिकांवर झालेले दीर्घकालीन परिणाम यांवर लक्ष केंद्रित केले आहे. या तणनाशकाचा व्हिएतनामच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर झालेला अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम, तेथील माती, पाणी, गाळ, मासे आदी जलचर आणि अन्नपुरवठा, लोकांचे आरोग्य यांवर डायऑक्सिनचा सातत्याने कितपत परिणाम झाला, याचा अभ्यास संशोधकांनी केला आहे.