आरोग्यानामा ऑनलाइन टीम : शरीराला प्रोटिन्सची आवश्यकता असते. यासाठी आहारात प्रोटिन्सयुक्त पदार्थांचा समावेश केला जातो. परंतु, जास्त प्रमाणात प्रोटिन्स घेणे हानिकारक ठरू शकते. आहारात किती प्रोटिन्स घ्यावे ? आणि कुठे थांबावे हे मात्र अनेकांना समजत नाही. यासाठी नेमकी किती प्रोटिन्स आवश्यक आहेत, त्याचे साधारण प्रमाण आहार तज्ञाकडून जाणून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची प्रोटिन्सची गरज वेगवेगळी असते. प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, अत्यावश्यक फॅट्स या सर्वांचे योग्य संतुलन शरीरात आवश्यक असते.
असे ओळखा प्रोटिन्सचे जास्त प्रमाण
१ आहारात आवश्यकतेपेक्षा जास्त प्रोटिन्स घेतल्यास शरीरातील कोलेस्टोरॉलचे प्रमाण हळूहळू वाढू लागते.
२ जास्त प्रोटिन्समुळे शरीरातील पाण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते. शरीराला पाण्याची कमतरता जाणवते. यासाठी वेळीच तपासणी करावी.
३ प्रोटिन्स वाढल्याने काहीवेळा शरीराचे तापमान नॉर्मलपेक्षा कमी होते.
४ प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, आवश्यक फॅट्सचे प्रमाण वेळोवेळी तपासून घ्या.
५ कोणतेही कारण नसताना वजन हळूहळू वाढू लागते.
६ प्रोटिन्स जास्त झाल्यामुळे किडनीवरही परिणाम होऊ शकतो.
Visit : arogyanama.com