आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कायम आनंदी आणि सकारात्मक राहणारा जोडीदार तुमचे आरोग्य आणि आयुष्य वाढवू शकतो, असे मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनात आढळून आले आहे. अशा जोडीदारामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाल्याने त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो.
हे होतात फायदे
१. आनंद आणि आरोग्य
आनंद आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध असतो. तसेच नातेसंबंध आणि जोडीदाराचा वैयक्तिक आयुष्यावरील परिणाम याचाही संबंध आहे. जोडीदार चांगला असलेल्यांचे आरोग्य वयानुरूप अधिक चांगले असते. आनंदी लोकांचे आरोग्य चांगले असते, असे काही संशोधनातून यापूर्वीच दिसून आलेले आहे.
२. पोषक वातावरण
आनंदी जोडीदार अधिक बळकट सामाजिक आधार देतात. तर नाखुष किंवा असमाधानी जोडीदार केवळ वैयक्तिक तणावावर लक्ष केंद्रित करतात. अशा स्थितीतच आनंदी जोडीदार आवश्यक असतो. आनंदी जोडीदार आपल्याभोवती आरोग्यास पोषक वातावरण निर्माण करतात.
३. काळजी घेणे
झोपेचे व्यवस्थापन, योग्य आहार, व्यायाम, व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रेरणा देणे, यामुळे ते चांगल्या आरोग्यास कारणीभूत ठरतात. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने हे निष्कर्ष हेल्थ सायकोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित केले आहेत.